आरोग्यविषयक लेख

सायकल चालवा – कॅन्सर आणि हृदय रोग टाळा

सायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात. […]

पोटदुखी टाळण्याचे काही सोपे उपाय

सध्याच्या बदलत्या जीवनमानामुळे आपल्याला विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटदुखी. आजकाल बऱ्याच जणांना पोटदुखीची समस्या भेडसावत आहे. साधारण एका व्यक्‍तीच्या पोटात दिवसातून 20 वेळा तरी वायू तयार होत असतो, त्यामुळे ही पोट दुखू शकते. पण कधी कधी ही पोटदुखी अगदी असह्य होऊन जाते. एखादी व्यक्ती पोटदुखीच्या समस्येने हैराण होऊन जाते. पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पद्धती बघूया. […]

शरीरात पाण्याच्या कमतरतेने उद्भवणाऱ्या समस्या

आपल्या शरीरासाठी पाणी म्हणजे जीवन असून आपल्या पृथ्वीतलावरील सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी श्वासाइतकीच पाण्याची देखील अत्यंत आवश्यकता असते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते तसेच त्याबरोबर आपल्या शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास देखील पाण्याची खूपच मदत होते. […]

दिक्षित की दिवेकर – कोणाबरोबर जाऊ ?

ह्या दोन्ही पद्धतीवरून असच नमूद करावं लागतंय कि वजन घटवण्यासाठी कोणत्याही आहार पद्धतीचा वापर करा, पण तो तुम्हाला कायम करता येईल असाच निवडा. कारण घटलेले वजन कायम घटलेले राहण्यासाठी तो उपयोगी ठरावा. […]

वजन कमी करताना तुम्ही या चुका टाळा

वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न सतत करीतच असते. काही लोक दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण जो उपाय समोरच्या व्यक्तीला लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो तोच आपल्यालाही लागू पडेल असे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे. […]

थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का?

जर का आपण थोडेसे जरी कष्टाचे काम केले तर दम लागतो का? आपल्याला नेहमीच पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो का? एखादे साधारणसे वजनदार सामान उचलण्यास आपण घाबरता का? याचा अर्थ तुम्ही बहुतेक लवकर थकत असाल. […]

वारंवार केसगळती होत असेल तर करा ही ‘५’ योगासने!

केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते. […]

लिंबूपाण्यामुळे दूर राहतील आरोग्याच्या या समस्या

उन्हाळ्यात लिंबूपाणी अगदी सर्रास प्यायले जाते. पण याचे फायदे आपल्याला नीटसे माहित नाहीत. पण फक्त लिंबूपाण्याने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करु शकता हेही तितकेच खरे आहे. पण त्यासाठी लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला नीट ठाऊक असायला हवी. […]

रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे. […]

डॉ. जॉन कर्कलीन

डॉ. जॉन कर्कलीन जगातील अगदी पहिल्‍या ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया करण्‍याचे श्रेय डॉ. जॉन कर्कलीन यांच्‍याकडे जाते. १९५० च्‍या दशकात डॉ.गिबनने विकसित केलेल्‍या ‘हार्ट-लंग मशीनमध्‍ये’ डॉ. कर्कलीन यांनी काही सुधारणा केल्‍या व त्‍या उपकरणाचा वापर शस्‍त्रक्रियेसाठी केला. आज हृदयावरील शस्‍त्रक्रियांमध्‍ये या उपकरणाचा वापर केला जाते. हार्ट-लंग मशीनचा सुकर व ‘रूटीन’ वापर होण्‍यामागचे श्रेय कर्कलीन यांचे आहे. ५ […]

1 2 3 123