भारताच्या अण्वस्त्रविषयक धोरणाचा पुनर्विचार आवश्यक

पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान भारतासमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही भारताच्या विरोधातील वागणे पाहता भारताने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाटते. पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही. मात्र, भारतावर अणुहल्ला झाल्यास प्रतिहल्ला करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करण्याचे भारताचे सध्याचे धोरण आहे. […]

जून महिन्यांतील तिसरा रविवार

गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. […]

ग्रिप्स नाट्य चळवळीचा सुवर्ण महोत्सव

मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली ‘ग्रिप्स नाट्य चळवळ’ सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव […]

अठराशे सत्तावन्नचा उठाव

आजपासून १६२ वर्षापूर्वी भारतात १८५७ च्या लढ्याला सुरुवात झाली. याला अठराशे सत्तावनचा उठाव असे ही म्हणतात. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. […]

जलसंधारण दिन

दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी मा.सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली. […]

१ एप्रिल – एप्रिल फूल

१ एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो. Fool म्हणजे मुर्ख. या दिवशी लोकं एकमेकांना मुर्ख बनवतात. एप्रिल फुल मित्रांनो एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे. ह्या प्रथेची सुरुवात केव्हा व कशी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. […]

जीमेलचा वाढदिवस

१ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा “गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा “एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी […]

१ एप्रिल १९५५ – रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत

दि. १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर व ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या आणि गेली सहा दशके मराठी मनावर रुंजी घालणाऱ्या ‘गीतरामायणा’चे ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ हे पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित […]

घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग

विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. […]

1 2 3 8