असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात. हे आजचं नाही . गेली २५ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते . […]
स्पर्धा पारितोषिकांसाठी(करंडक, ढाल ,चषक वगैरे)असतात की बक्षिसाच्या रकमेसाठी की मिळालेल्या व्यासपीठावर स्वतःला पारखून घेण्यासाठी असतात कां मैत्र नको, शत्रू हवा याचा सर्वांनीच यानिमित्ताने (पुन्हा एकदा) विचार करण्याची पाळी आलीय. […]
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. […]
पंढरीच्या वारीत एकाचवेळी संतपरंपरा आणि लोकपरंपरा गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात. संतांना लोकोद्धाराची तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते. […]
“हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”. “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय” […]
कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे . तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे . […]
सर्व प्रतिभावान कलाकारांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या संस्थेला वर्धिष्णू स्वरूप लाभावे , बावीस वर्षांपूर्वी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे , तो विशाल व्हावा आणि आसमंत संगीताच्या इंद्रधनुषी रंगाने व्यापून जावा यासाठी , संस्थेचे आद्यदैवत असणाऱ्या श्री नटेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !!! […]
आषाढ सुरु होतो तोच वारी चे वेध घेऊन…!! आम्ही सुद्धा गेलो होतो वारीला…!हे दुसरं वर्ष आमचं!! नोकऱ्या… शाळा कसं काय जमणार २१ दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला वैगरे सारखे प्रश्न गेल्यावर्षी पासून अडगळीत गेले ते गेलेच…. माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा !!! अहो…जिथे जगतनियंता पाठीशी उभा तिथे इतर चिंता उभ्या राहतायत होय ? हां […]