नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

नवं -जुनं !

अनेक वर्षांपूर्वी मी ठाण्याला असताना वंदना चित्रपटगृहात आमिरचा “सरफरोश “बघितला होता आणि तेथील नैसर्गिक उकाड्यात इतका उबलो की तो चित्रपट आत पोहोचलाच नाही. नंतर काही वर्षांनी दूरदर्शनवर पाहिला आणि चक्क आवडला. […]

शरणपत्रे!

राजकारण्यांनी जेव्हापासून शिक्षकांना पदरी नोकरीला ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून शिक्षकांनी शरणपत्रे लिहून द्यायला सुरुवात केली. पुराणकाळात सुरुवात झाली द्रोणाचार्यांपासून ! त्यांना धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांसाठी – कौरव-पांडवांसाठी गुरु (शिक्षक) म्हणून नेमले. आणि मग द्रोणाचार्य कुरुक्षेत्राच्या युद्धात (कदाचित) मनाविरुद्ध ओढले गेले-राजनिष्ठेचे पालन म्हणून ! […]

संत संगती

संत एकदा आपल्या वाट्याला आले की ते “जेथे जाऊ तेथे” सतत सोबत करत असतात- हरीप्रसाद /किशोर/उस्मान च्या रूपात ! मग वेगळ्या दर्शनाची, वारीची गरज पडत नाही. ते असतातच! […]

शब्द, शब्द, शब्द, शब्द!

गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय. […]

५ सप्टेंबर ! शिक्षक दिन !!

जेंव्हा शिक्षक नव्हतो तेंव्हा ” प्रशिक्षक (ट्रेनर ) झालो. प्रक्रिया थोडीफार तीच ,पण आवडली. शिक्षक बनून- learning तर प्रशिक्षक बनून unlearning followed बाय relearning ! फरक काय तो एवढाच ! […]

चिरा गल्ली गणेशोत्सव मंडळ, भुसावळ

भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे). […]

२८ मार्च १९९३ – मु.पो.साखराळे

माझे पहिले-वहिले पुस्तक ” माणूस नांवाचे निगेटिव्ह वर्तुळ ” (एकांकिका-संग्रह) आमच्या महाविद्यालयाच्या नवनिर्मित सेमिनार हॉल मध्ये प्रकाशित झाले. महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या मराठी पुस्तकाचे “अभियांत्रिकी” महाविद्यालयात प्रकाशन व्हावे,हे दुर्मिळ ! बहुधा त्या सेमिनार हॉलमध्ये मी साखराळे सोडल्यावर असा युनिक साहित्यिक कार्यक्रम पुन्हा झाला नसावा. […]

कापूसखेड नाका, स्टाफ क्वार्टर नं ३/४

आजवर मी केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कालावधी मी इस्लामपूरच्या “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, साखराळे (CEPS) किंवा CEPR(राजारामनगर) मध्ये व्यतीत केलेला आहे. […]

माझ्या मामाचं पत्र “हरवलं”

“कुठे नेऊन ठेवलीय आमची शिक्षण व्यवस्था ” असं त्राग्याने म्हणणारे माझे मन क्षणार्धात शांत झाले. आज विषण्णपणे, उद्वेगाने हे आठवलं कारण १९८४ पासून शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करीत असल्याने त्या क्षेत्राची सतत घसरगुंडी होत असल्याचे अनुभवत आहे. […]

1 2 3 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..