नवीन लेखन...

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून भगवद् गीता

भगवद् गीता या, सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी सांगितल्या/लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर आतापर्यंत हजारो विद्वानांनी भाष्य केलं आहे आणि अजूनही अनेक विद्वानांना निराळ्या दृष्टीकोनातून भाष्य करावसं वाटतं आहे. गीतेच्या  18 अध्यायात वेदोपनिषदांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. गीता म्हणजे अुपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं. गीता लिहून सुमारे 5 हजार वर्षांचा काळ अुलटला आहे. या काळात, विशेषत: पंधराव्या-सोळाव्या शतकांपासून […]

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ४ – झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्व

आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे. […]

माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.
[…]

अती सामान्य पण असामान्य :: सजीवांचा आहार आणि आनुवंशिक आज्ञावल्या.

सजीवांचे शरीर हे एक स्वयंचलीत यंत्र आहे. त्यामुळे त्याला, आपले नैसर्गिक व्यवहार करण्यासाठी उर्जेची गरज असते. निसर्गाने, ही उर्जा मिळण्यासाठी, परिपूर्ण अशी योजना फार कल्पकतेने केली आहे असे दिसून येते आणि तीही कोट्यवधी वर्षांपूर्वी. प्रत्येक सजीवाचा आहार हेच निसर्गाने शोधलेले आणि अत्यंत यशस्वीरित्या वापरलेले उर्जासाधन आहे. […]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद्गीता : अ. २ श्लोक १३

गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.
[…]

अध्यात्मिक संकल्पनांची विज्ञानीय स्पष्टीकरणे

पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्‍यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.
[…]

विज्ञान आणि अध्यात्म ः युगान्तरे.

या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे. […]

डार्विनचा अुत्क्रांतिवाद

डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्‍याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करू शकते म्हणजे आनुवंशिक तत्वच सजीवांचा आत्मा असला पहिजे. या तत्वानुसार मी आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मांडला आहे.
[…]

सजीवांचे शरीर आणि आत्मा

आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..