नवीन लेखन...
Avatar
About रविंद्रनाथ गांगल
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

खरं काय अन् खोटं काय?

आपल्या ऐकण्यात व वाचण्यात पॉलीग्राफ, नार्को असे शब्द येत असतात. त्याची माहिती व्हावी हा या लेखामागचा उद्देश. […]

रिक्षावाल्याचा सुखद नकार

सोलापूरहून अक्कलकोटला चालत जाण्याची कल्पना माझ्या मुलाने, विराजने अमलात आणली. त्याच्या मित्रांनाही तो घेऊन जात असे. मीपण एक शनिवार रविवार असा बेत ठरविला. शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघून सोलापूरला पहाटे उतरायचे, […]

वेदना

जीवन हा संघर्ष आहे. शारीरिक असो वा मानसिक असो, संघर्षाबरोबर वेदना आल्याच. वेदना नको म्हणून संघर्ष नको असे म्हटले तर जगण्यातले वैविध्य, नाविन्य संपेल. जीवन नीरस, बेचव होईल. वेदनेचा सामना समजून उमजून करण्यातच आपले भले आहे. […]

झोप का हवी

झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे. […]

वर्तमानकाळ म्हणजे काय?

जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्‍या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे. […]

विद्वान सर्वत्र पूज्यते

‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ अशी ओळ एका संस्कृत श्लोकात आहे. विद्वानांना सर्व ठिकाणी सन्मान मिळतो असा त्याचा अर्थ. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असलेला त्या विषयात विद्वान समजला जातो. विद्वत्ता आणि बुध्दिमत्ता वेगळ्या गोष्टी आहेत. बुध्दिमत्तेला अनेक पैलू असल्याचे लक्षात आले आहे. नुसत्या IQ वरून बुध्दिमत्तेचे मोजमाप होऊ शकत नाही हेही समजले आहे. तसे विद्वत्तेला पैलू आहेत का? […]

हसण्यावारी नेऊ नका

आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्‍याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो. […]

स्मृती-विस्मृती

मानवी मेंदू सर्व प्राणिमात्रांच्या मेंदूंपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ठ्ये आहेत. आपली माहिती साठविण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप-खूप जास्त आहे. मिळविलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठविलेल्या माहितीला `स्मृती’ म्हणतात. योग्य वेळी ही माहिती वापरता येणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती `विस्मृती’. […]

करायला गेलो एक

माझे ‘Culinary Skills’ कसे वाढत गेले ते ह्या प्रसंगातून कळेल. पंचवीस वर्षापूर्वी मी माझे बिर्‍हाड पॅरिसला थाटले होते. किचनमधुन ‘आयफेल टॉवर’ दिसत असे. रोजचे जेवण बनविणे सवयीचे झाले होते (ब्रेडच्या विविध प्रकारांनी मला आधार दिला). एका सुट्टीच्या दिवशी माझ्या डोक्यात रवा, साखर व तूप यांचा झिम्मा सुरू झाला व मी शीरा करण्याचा निश्चय केला. […]

यदृच्छता (Randomness)

आज Randomness ही संकल्पना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरावी लागते आहे. संगणकाच्या मदतीने हे सोपे झाले आहे. आपल्याला याची अनेक उदाहरणं सापडतील. एखादी व्यक्ती अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडण्याची शक्यता फार कमी असते. तरी यंदा बिहार व उत्तर प्रदेशात वीज पडल्यामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. तशीच आणखी एक आश्चर्यकारक घटना आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया पार्कमध्ये काम करणारा रेंजर, रॉय सलिव्हन याच्या अंगावर 1942 ते 1977 या काळात वेगवेगळ्या प्रसंगी सात वेळा वीज पडली. तो प्रत्येक वेळेस वाचला व पुढे 71 व्या वर्षापर्यंत जगला. अशा असतात यदृच्छतेच्या करामती. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..