नवीन लेखन...
Avatar
About रविंद्रनाथ गांगल
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

एकाकी लढा

आपला समाज कुटुंबरचनेचा पुरस्कार करतो. सर्वसाधारणपणे दोन-तीन पिढ्या एकत्र रहात असलेली कुटुंबे दिसतात. विस्तारामुळे कुटुंब विभक्त झाली तरी नाती दृढ राहतात. वेळप्रसंगी एक होतात मदतीसाठी, सांत्वनासाठी वा आनंद साजरा करण्यासाठी. असे असले तरी याला अपवाद सापडतात. अशीच एक घटना माझ्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली. […]

कोरोनाची शाळा

पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल. […]

देशोदेशींचे ज्ञानेश्वर

“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?” […]

चित्रभाषा

मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्‍या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे. […]

बालपणीचा काळ सुखाचा

‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला की हरवून जातं मन. आठवणींची झुंबड उडते मनात. दिवाळीचे व गणपतीचे दिवस, गोकुळाष्टमीचे व होळीचे दिवस, सुट्ट्यांचे व सहलीचे दिवस आठवतात. प्रत्येक सण वा प्रसंग हे आपल्याला भरभरून देत असतात. असे खास दिवस साजरे होण्यापूर्वी तयारी करण्यात वेगळीच गंमत असते, तर ते खास दिवस पार पडल्यानंतर येणारी ‘पोकळी’ ही देखिल आयुष्याच्या चक्राविषयी नकळत शिकवीत असते. […]

सुखाचे सोपे मार्ग?

संगणक व मोबाईल याद्वारे समाजमाध्यमे वापरणारांचे प्रमाण वाढत आहे. काहींच्या बाबतीत व्यसनाच्या पातळीवर हा वापर पोचलेला आहे. याचं कारण सुरुवातीला नोंदलेल्या वाक्याने स्पष्ट होईल. एखाद्या व्यक्तीला समाजमाध्यमातून सुखद जाणिवा कशा मिळतात? […]

सहजीवन

.. आजही टेरेसवर येणारी दोन कबुतरे माझ्या तळहातावरील तांदूळ निर्धास्तपणे खात असतात. पण आधी बोटांच्या पेरांवर चोच मारून धोका नसल्याची खात्री न चुकता करतात. सहनिवासात (Society) राहणार्‍यांशी सलोखा ठेवताना या पाहुण्यांचा सहवासही किती प्रेरणादायी असतो नाही का? सहजीवन म्हणजे आणखी काय असते? […]

मी आणि WhatsApp

मला WhatsApp वापरायला लागून वर्ष झाले तरी …   मी ‘लाइक’ केला नाही, मी ‘ईमोजी’ निवडली नाही, मी एकही साधा मेसेज ‘फॉर्वर्ड’ केला नाही ||1|| मी उपदेश केला नाही, मी सुवचन धाडले नाही, मी आजवर विनोदी चुटका रवाना केला नाही ||2|| मी ‘दैनिक शुभेच्छा’ चालवले नाही, मी भविष्य कथिले नाही, मी ‘नेट’वरची रंगीत फुले पाठविण्यात रंगलो […]

भटकंती

‘भटकणे’ हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. माहित असलेल्या वाटेवरून फिरण्याला भटकणे म्हणतात. काही उद्देशाने केलेली रपेट व पाय नेतील त्या वाटेने केलेली चाल हा भटकण्याचाच प्रकार. काही न ठरवता केलेली पदयात्रा व चालण्याच्या स्पर्धेमध्ये कापलेले अंतर हेही भटकणे नाही का? सपाटीवरून केलेले भ्रमण व डोंगरदर्‍यातील फिरणे ही भटकंतीची रूपे आहेत. ठराविक काळात ट्प्पे पार करीत […]

लढा

एका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..