संगीतातून व्यसनमुक्ती… (बेवड्याची डायरी -भाग ३४ वा)

आज सायंकाळी ‘ म्युझिक थेरेपी ‘ आहे हे मला सकाळीच समजलेले …शनिवारी संध्याकाळी प्राणयाम आणि समूह उपचाराच्या ऐवजी संगीत उपचार होतो हे सांगून शेरकर काका मला म्हणाले होते ..तुला पण गाणे म्हणावे लागेल ..मी घाबरलोच ..मला संगीत आवडत असले तरी ..गाणी म्हणण्याचा वगैरे प्रकार कधी केला नव्हता ..गाणी खूप ऐकली होती ..म्हणजे सिनेसंगीत ..गझल्स ..विरहगीते वगैरे […]

लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….

लॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच सर्व क्षेत्रातील व्यवसाय / उद्योगधंद्यांवर याचा परिणाम होणार आहे. साहित्य क्षेत्र याला अपवाद असेल का? या बदलत्या जगाचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम होईल? पुस्तक प्रकाशन व्यवसायाचं भवितव्य काय असेल ? वाचनालयांचे भवितव्य काय असेल?  असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. तुम्हाला […]

घरातील आतंक…नौटंकी ! (नशायात्रा – भाग ३४)

गर्द आणि इतर व्यसनांच्या मी पूर्ण आहारी गेलो होतो व आता माझी घरातील पैश्यांची मागणी वाढली होती , ती प्रत्येक वेळी पूर्ण होणे शक्यच नव्हते तेव्हा मग घरात छोट्या मोठ्या चोऱ्या सुरु झाल्या वडील पक्षाघातातून बरे होऊन आले होते आणि पुन्हा त्यांनी कामावर जाणे सुरु केले होते मात्र ते जरा विसरभोळे झाले होते त्याचा फायदा घेऊन मी त्यांच्या पाकिटातून पैसे गुपचूप काढत असे , […]

सुंदरतेचा आस्वाद ! (बेवड्याची डायरी – भाग ३३ वा)

इथे आल्यापासून एक चांगली सवय लागलीय मला ..लवकर उठण्याची ..सकाळी साडेपाचला बेल वाजण्यापूर्वीच मला जाग येवू लागली आहे ..विशेष म्हणजे उठल्यावर एकदम फ्रेश वाटते ..याचे कारण रात्री वेळेवर झोप हे असावे बहुतेक ..तसेच इथे मी सगळ्या कौटुंबिक व इतर प्रकारच्या चिंतांपासून दूर असल्याने मनस्थिती देखील चांगली राहतेय ..घरी असताना रात्री कितीही दारू प्यायलो असलो तरी लवकर […]

रेल्वे स्टेशनवरील लुटमार ! (नशायात्रा – भाग ३३)

सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता . […]

वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो. […]

आत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)

सरांनी ‘ फक्त आजचा दिवस ‘ मधील पुढील सूचना फळ्यावर लिहिल्या होत्या .. ७ ) आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरी मी तसे दर्शवणार नाही . ८ ) फक्त आजचा दिवस मानसिक व्यायाम म्हणून मी स्वतःला न आवडणाऱ्या दोन तरी गोष्टी करेन . ९ ) फक्त आज […]

टपाल पेटी…

तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा. […]

इंदिरा गांधी यांची हत्या.. जाळपोळ.. लुटमार ! (नशायात्रा – भाग ३२)

सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ‘ इंदिरा गांधी ‘ यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती , […]

कार्यक्रमाचा कार्यक्रम…

आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. आपल्याकडे सातत्याने उत्सव साजरे होत असतात. समारंभ होत असतात कार्यक्रमही होत असतात. उत्सव आणि कार्यक्रमात आपल्याकडे फारच उत्साह संचारलेला पहायला मिळतो. कार्यक्रमाचे तर विचारूच नका. कार्यक्रम कोण केव्हा कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यातही नाना तऱ्हा असतात कार्यक्रमाच्या. […]

1 2 3 9
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....