मानसी कावले (मी मानसी)
About मानसी कावले (मी मानसी)
मी मानसी कवळे. मराठीमध्ये M.A.(1st sem.)केले आहे. प्रॉविडंट फंड कार्यालयातून निवृत्त झाले आहे. Email: manasinamdeo@gmail.com
Contact: Facebook

मोहाचे घर

मनाच्या हळुवार तारा……. आज छेडील्या कोणी जरा। तशी बावरले मी मोहरले मी ……..सूर नवे जागले।।१।। झुळुक सुरांची आली……… गोड सुखाची बरसात झाली। अंकुरली प्रीत ओलेत्या मातीत ……..मलाही ना कळले।।२।। हुंकारलीे ती मनात………….. जीव आसावला आत आत। वेगळी जाणीव नुरली उणीव …….स्वप्नच आकारले।।३।। स्वप्नाची भूल धुसर….. दिसे प्रेमाचे गांव सुंदर। मागे मागे जशी चालले मी अशी ………….लगबगी […]

संस्कार

काहीतरी आहे असे जे …. साथ होते साथ आहे! राख मी होईन तेव्हा ….. . जाईल! म्हटले जात आहे! वय तयाचे कोवळे ……. म्हातारेही तितुकेच आहे! वाढले माझ्यासवे ते …. माझ्यात मुरले आत आहे !!! ……… मी मानसी

वळण…

सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना? […]

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

‘मी’

शिकावेच म्हणतो मी अता चेहरे बदलायला… अनोळखी माणसात माझ्या ओळखीचे व्हायला!!! ….मी मानसी

मिटलेलं पान

तुटलेल्या नात्यांचे जरतारी पदर त्या ना मायेची उब प्रेमाची कदर गाठीगाठीत फक्त बोचरे आठव कशास मिरवायचे? भरजरी पाटव !……… १ तो पाठीवर हात अन डोळ्यात पाणी ते तुडुंबलेलं मन श्वासात गाणी क्षणाक्षणाने दिलं जीवनाचं दान उघडेल का कोणी ते? मिटलेलं पान !………… २ …..मी मानसी

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

अबोला

अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी

लोक

बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी

1 2 3