रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे. […]
कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.” […]
हे कलियुग आहे कलीचा वाऱ्याप्रमाणे ही माणसे वागतात पण सत्य कुठे लपत नाही संत थोर होत त्यांचे विचार आचार वेगळी होत आता या जनतेने कसे वागावे हे तुम्हीच ठरवा यू हवे हल्ली सगळीकडे वातावरण फार वाईट आहे जग बुडी ची वेळ आली आहे इथून पुढच्या काळात तरी प्रत्येकाने सगळ वागावे यातच भलेपणाचा आहे. माणसासारखे वागा माणूस म्हणून जागा आपलं सर्वांना म्हणा […]
गायत्री मंत्रांबद्धल अनेक लोकांना कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेक लोकांना ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं’ ही सविता गायत्री म्हणजे सूर्य गायत्री माहिती असते. मूळ सूर्य गायत्री मंत्राशिवाय पण अशा खूप गायत्र्या आहेत. त्या या लेखात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. गायत्र्या वेगवेगळ्या देवतांच्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही. […]