अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

पंप रामायण

उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच  प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र  याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. […]

शिवलीलामृतकार श्रीधर स्वामी

श्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे  वापरले.  त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात..  […]

जीवन आणि यश

मनुष्य स्व इच्छेने जगतो मग इच्छा अनुसार झाले की सुख आणि इच्छा अपूर्ण असल्याचे दुख. फक्त सुख आणि दुख म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जगण्यातील जिवंतपणा आणि तो आज नाहीसा झालेला दिसतो. जे खरे जीवन आहे ते प्रकृतीचे व वास्तवातले आणि खोटे ते कल्पनेतले मग जरा विचार करूया या जीवनामध्ये जगण्या इतके आपले आयुष्य असते तरी किती ? जर साठ वर्ष धरले तर वीस वर्ष झोपण्यात गेले, दहा वर्ष बालपण , दहा वर्ष career साठी, शेवटचे दहा वृद्ध अवस्थेत पश्य ताप करत बसण्यात. राहले दहा, व्यर्थ गोष्टी व मूर्खपणा जाणे केवळ वेळ वाया जातो अशा गोष्टी साठी पाच वर्ष. राहले पाच मग इतकेच असते जे जगायला मिळते हो फक्त इतकेच. मग असे ही एक वेगळं जीवन आहे, ते थोडं भिन्न व नैसर्गिक जे प्रकृती अनुसार असते. […]

मोद भरल्या कौमुदीने मोद बहरो जगभरी….

सा-या  भूतलावर शरदाचे चांदणे  बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला  आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया…. कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते. […]

श्री गणेश चतुर्थी पूजेमागील विचार व आशय

गणपती ही विद्येची व सकल कलांची आराध्य देवता,गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.प्रतिवर्षी येणा-या गणेश उत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतला तर या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल. […]

स्त्रियांच्या रजोदर्शन काळातील अस्पर्शता आणि त्याविषयीच्या भूमिकेमध्ये बदलाची आवश्यकता

मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील एक शारीरिक नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने विचार करता मासिक पाळीचे महत्व स्त्रीच्या आयुष्यात महत्वाचे आहे.नवीन जीवाला जन्माला घालण्याची ही क्षमता स्त्रियांचे पुरुषांपेक्षा असेलेले वेगळेपण दाखविते.असे असले तरी हिंदू परंपरेमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अस्पर्श किंवा अशुद्ध समजले जाते. सदर शोधनिबंधात या विषयी काही नवा विचार मांडण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न […]

मृत्यूपश्चातचे विधी – माझी भूमिका

मृत्यू हा अटळ आहे, त्याला पर्याय नाही , ती मनुष्य जीवनाची अनिवार्यता आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच सुखावह घटना नाही. जवळच्या आप्ताचा, स्नेहीजनाचा मृत्यू अनुभविताना कोणत्याही सहृदय माणसाचे मन हेलावते, शोकमग्न होते. […]

अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत. […]

गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा

गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’ मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. […]

भारतातील आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती […]

1 2 3 4 44