नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर

प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. […]

आंजर्ले गावचे कड्यावरील गणपतीचे मंदिर

आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यात (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी वसले आहे. गावाला जोडणारी वाहतूक व्यवस्था परिपूर्ण असून आंजर्ले – वेसवी – मंडणगड-मुंबई त्याचप्रमाणे आंजर्ले – दापोली व तेथून मुंबई- पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी असे रस्ते आहेत. […]

श्रीमाणिकप्रभु महाराज, हुमणाबाद

श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयाचे तृतीय पुर्णावतार म्हणून श्रीमाणिकप्रभूंचेच नाव घ्यावे लागेल. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्वर यांनी श्रीमाणिकप्रभूंच्या अवताराचे भाकीत बरेच दिवस आधी वर्तवले होते. श्रीमाणिकप्रभूंचे सारेच चरित्र अतर्क्य व अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांची अलोट संपत्ती, अतुल ऐश्वर्य, त्यांनी केलेले अमाप अन्नसंतर्पण इत्यादी लोकोत्तर गोष्टी वाचून वाचक खरोखरच स्तिमित होतो! […]

तू सुखकर्ता तू दुखहर्ता

गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. […]

गजाननासी वंदन करुनी

मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. हे गाणे स्वतः कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले. […]

श्रीनृसिंहसरस्वती महाराज, कारंजे

श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात. […]

अशी चिकमोत्याची माळ

लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे, पाय थिकरवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. […]

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, कुरवपूर

श्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्याच्या पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्यापलीकडे त्यांची माहिती इतर कोठल्याही ग्रंथात विशेष करून मिळत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधुन त्यांचे चरित्र सर्वश्रुत झाले आहे. श्रीगुरुचरित्र ज्यांनी लिहिले त्या श्रीसरस्वती गंगाधरांचा हेतू श्रीनृसिंहसरस्वतींची लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपादश्रीवल्लभांची माहिती त्यात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे. […]

तुझ्या कांतिसम रक्तपताका

गणपतीच्या पारंपारिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.’अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे. […]

1 2 3 4 5 6 150
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..