मंदिराचे दाराशी एका कमानीला नऊ लहान मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एका घंटेवर १८५७ असा आकडा कोरला आहे. अर्थात तो इंग्रजीत असून घंटेचा आवाज लोकांना आकर्षित करतो. देवीच्या सभामंडपावर एक शिलालेख दिसून येतो तो असा की एकवीरा देवीचे जुने मंदिर मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या मदतीने इ. सन १८६६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. […]
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील शिल्प हेमाडपंती असून तिथे नारदमूर्तीचे दर्शन घडते. पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर ब्रह्मदेवाने जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धाऊन आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. […]
पुराणातील काही संदर्भांनुसार, ज्या घरांमध्ये तुळस लावलेली असते आणि नियमित सकाळी तुळसपूजन केले जाते, त्यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते, अशी मान्यता आहे. त्या कुटुंबांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुळशी वृदांवनामुळे आजूबाजूचे वातावरण पवित्र राहते. नकारात्मकतेला थारा राहत नाही. तुळशीचा वास असलेल्या कुटुंबात सदस्य कमी आजारी पडतात. […]
धम्मगिरी, इगतपुरी (महाराष्ट्र) येथे स्थित एक प्रसिध्द विपश्यना केंद्र आहे. हे केंद्र खास विपश्यना ध्यान साधनेसाठी ओळखले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. धम्मगिरीचे संस्थापक श्री सत्यनारायण गोयनका (गोयंका गुरुजी) होते, ज्यांनी विपश्यना साधनेसाठी हे केंद्र उभारले. […]
शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे. […]
आपली भारतभूमी ही साधुसंतांच्या वास्तव्याने पावन झालेली मंगलभूमी आहे. ईश्वरी साक्षात्कार हेच सर्वोच्च मूल्य मानून त्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा हजारो सत्पुरुषांची ही कर्मभूमी आहे. […]
कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो. जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत […]
श्रावण महिना घेऊन येतो आनंद, उत्साह आणि जगण्याची नवी उमेद. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण उत्सवाच्या निमित्ताने सर्वांसह मिळून आनंदाने घालवायला असे सण समारंभ नक्कीच हवे असतात. वर्षभराची ऊर्जा देणारा हा श्रावण महिना आरोग्य,पर्यावरण,संस्कृतीचा सर्वांगीण विचार करणाराच आहे असे म्हणता येईल. […]
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली. श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली […]