नवीन लेखन...

लास्ट पोस्ट

मिलिटरीमध्ये लास्ट पोस्ट नावाचा एक उपचार असतो. बिगुलची एक सुंदर धुन वाजते आणि तो दिवस संपतो. ही लास्ट पोस्ट सुरु कशी झाली याची एक हृदय कहाणी आहे.

गोष्ट अमेरीकेतली आहे. १८६२मध्ये अमेरीकेमध्ये सिव्हील वॉर झाली. लष्करातला एक उच्च अधिकारी असतो. हाच तो युनियन आर्मीचा कॅप्टन रॉबर्ट एलिकोंब असतो. युध्दाच्या दरम्यान तो एका विशिष्ट ठिकाणी नियुक्त असतो. दुसऱ्या बाजूला कॉनफिडरेट आर्मी त्यांच्याशी युध्द करत असते. दोन्हीही बाजूचे लढवय्ये अमेरीकेचेच असतात.

रात्रीच्या गर्द अंधारात एलीकोंबला कण्हण्याचा आवाज येतो. एलीकोंबला वाटते कोणी जवान जखमी अवस्थेत पडला आहे. अजूनही समोरासमोर युध्द चालू असते. दोन्हीबाजूंनी प्रचंड गोळीबार चालू असतो. आगीचे लोळ उठत असतात. तश्याही परिस्थितीत एलीकोंब त्या जखमी जवानापर्यंत पोहोचतो. प्रत्यक्षात त्याने मोठेच धाडस केलेले असते. आपले प्राण जोखिमीत टाकलेले असतात.

कसाबसा त्या जवानाला पाठीवर टाकून एलीकोंब आपल्या कॅम्पपर्यंत येतो. कॅम्पवर पोहोचेपर्यंत तो जवान मरुन जातो. त्या जवानाचा चेहरा पाहिल्यावर एलीकोंब दचकतो. तो त्याचाच कोवळ्या वयाचा मुलगा असतो. तो शिकायला त्याच्यापासून दूर गेलेला असतो. यादवी युध्द सुरु झाल्याचे कळताच तो स्वतःहून कॉनफिडरेट आर्मीमध्ये दाखल होतो. वडीलांना याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे आपण उचलून आणलेला मृत जवान आपलाच मुलगा आहे हे बघून त्यांना प्रचंड धक्का बसतो.

आपल्या मुलाचा अंत्यविधी करायचा निश्चय एलीकोंब करतो. तो त्याच्या वरिष्ठांकडे त्यासाठी परवानगी मागतो कारण मुलगा विरोधी दलात असतो. मुलगा एलीकोंबचा असल्याने वरिष्ठ त्याला अंत्यविधी करण्याची परवानगी देतात. त्यानंतर एलीकोंब आपल्या वरिष्ठांना अशी विनंती करतो की त्यावेळेला आर्मीचा बँड वाजविण्यात यावा. अर्थातच ही विनंती मान्य होत नाही. एलीकोंब उदास होतो. त्याचा मुलगा संगीतप्रिय असतो. एलीकोंब पुन्हा अर्ज टाकतो की निदान एका जवानाने आपल्या मुलाच्या अंत्यविधीच्या वेळी बिगुल वाजवावे. कशीबशी त्याची हि विनंती मान्य होते. मुलाच्या अंत्यविधीला एकाकी जवानाकडून बिगुल वाजवत, मानवंदना देत तो दिवस संपतो.

त्या लास्ट पोस्टचे शब्दही हेलावून टाकणारे आहेत. त्यांचा थोडक्यात आशय असा आहे:

दिवस मावळत आहे
सूर्य निमाला आहे
पाण्यावरुन, झाडांवरुन, डोंगरांवरुन
उतरला आहे सर्व काही सुरक्षित आहे.
सर्व काही ठीक आहे.
ईश्वरही आहे.
निघून जाणाऱ्या अंधारात
एक तारा
तेजाने चमकतो आहे.
रात्रीने आपल्याला
कुशीत घेतले आहे
झाल्या दिवसाबद्दल
आपण ऋणी आहोत
या सूर्याखाली, या ताऱ्यांखाली,
या आकाशाखाली,
आपल्या सोबत
ईश्वर आहे,
आपल्याला ते माहीत आहे….

हे गीत ऐकून कोणाच्याही गळ्यात आवंढा दाटल्याशिवाय राहणार नाही. लास्ट पोस्टचा हा उपक्रम एलीकोंबच्या मुलाच्या अंत्यसंस्कारापासून सुरु झाला. आजतागायत ही प्रथा आर्मीमध्ये जगभर चालू आहे. युध्दातही अशा हृदयस्पर्शी घटना घडतात. अशी हृदय हेलावणारी ही कथा.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..