नवीन लेखन...

बाहुलीची किंमत

सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले. तो तिच्या जवळ जालो आणि सुटकेचा निश्‍वास टाकतो. “मला वाटलं, तू हरवली आहेस, बरं झालं तू सापडलीस,” तो बहिणीचा हात हातात घेऊन म्हणतो.

बहीण तरीही काहीच बोलत नाही. तिचे लक्ष दुकानातल्या काचेच्या कपाटातल्या एका सुंदर बाहुलीकडे असते. ती एकटक त्या बाहुलीकडे बघत असते. भावाला कळते की आपली बहीण बाहुलीला बघून मोहित झाली आहे. “तुला ती बाहुली आवडली आहे काय?” तो विचारतो. बहीण मानेनेच होकार देते. भाऊ त्या दुकानात जातो. दुकानदाराला विचारतो “ही बाहुली केवठ्याची आहे? माझ्या बहिणीला ती फार आवडली आहे.

दुकानदार हा सगळा प्रकार पहात असतो. सहा वर्षाचा छोटा मुलगा आपल्या बहिणीचे ल्राड करण्यासाठी खटपट करतो आहे हे त्याच्या ध्यानात येते. दुकानदार त्याला विचारतो “तू मला या बाहुलीची काय किंमत देऊ शकशील?” मुलगा म्हणतो “माझ्या जवळ खूप सारे शंख शिंपले आहेत. ते मी तुम्हाला देऊ शकतो. ते शंख शिंपत्रे मला जीव की प्राण आहेत. मात्र माझ्या बहिणीच्या आनंदासाठी मी ते तुम्हाला द्यायला तयार आहे.”

मुलगा आपल्या खिशातून शंख शिंपत्रे काढून दुकानदाराजवळ देतो. “बघा बरे यात काम भागेल काय?” तो निरागसपणे दुकानदाराला विचारतो.

दुकानदार सगळे शंख शिंपले मोजल्यासारखे करतो. मुलाकडे बघून त्याला म्हणतो “हे तर फार जास्त आहेत. मला फक्त चारच शेख पुरतील. उरलेले मी तुला परत देतो.” मुलगा उरलेले शंख शिंपले दुकानदाराकडून घेऊन आपल्या खिशात टाकतो. ते परत मिळाल्याचा त्याला फार आनंद होतो. बाहुली घेऊन दोघे बहीण भाऊ दुकानातून जातात.

त्या दुकानातला नोकर हे सगळे नाट्य पहात असतो. त्याला आपल्या मालकाचे आश्चर्य वाटते. तो मालकाला म्हणतो “एवढी महाग बाहुली तुम्ही त्या मुलाला फुकटच देऊन टाकलीत. चार शेख आपल्या जवळ ठेवल्याचे नाटक केलेत. तुम्ही त्याला सांगायला प्राहिजे होते की त्या बाहुलीची किंमत बरीच आहे.”

मालक हसतो आणि म्हणतो “मला त्या मुलाचा आविर्भाव आवडला. एखादया जबाबदार भावाप्रमाणे त्याने आपल्या बहिणीसाठी बाहुली मागितली. पैसा काय हे त्याला अजून नीटसे कळत नाही. त्यामुळे त्याने त्याच्यासाठी मौल्यवान असलेले शंख शिंपत्रे मला देऊ केले. मला वाटले त्याच्या भावनेची कदर करावी.”

नोकर म्हणतो “त्याला हा सोदा कळणार पण नाही. तुम्हाला मात्र हा सौदा महागात पडला.” मालक म्हणतो “नाही, मला तसे वाटत नाही. आज ना उद्या त्या मुलाला कळेल की त्याने शंख देऊन महाग बाहुली माझ्याकडून बिकत घेतली. ज्यावेळी त्याला याचे आकलन होईल त्यावेळी*त्याला माझी प्रकर्षाने आठवण होईल. त्यावेळी त्याला वाटेल की जगात चांगली माणसे आहेत. एका सकारात्मक भावनेने तो जगाचा विचार करु लागेल. मुलांना प्रबोधन देण्याऐवजी अशा प्रसंगातून संस्कार देणे मला जास्त महत्वाचे वाटले. केलेल्या गोष्टीचा मला जराही पश्‍चात्ताप होत नाही. तू ही याचा विचार करु नकोस. तुझ्या कामाला लाग.”

असे म्हणतात की आपण सकारात्मक भावना पसरविल्या की त्या दूरवर पोहोचतात आणि नकारात्मक भावना निर्माण केल्या की त्याही लोकांना प्रभावित करतात. आपण चांगल्याच गोष्टी पसरविल्या पाहिजेत. मुलांच्या मनात जगाबद्दल सकारात्मक विचार निर्माण केले पाहिजेत. लहान वयातच त्यांना वैफल्य वाटू लागणे चांगले नाही. त्यांना जगाबद्दल, जीवनाबद्दल सकारात्मक संकेत मिळायला हवेत.

एका छोट्या दुकानदाराने किती दूरदर्शी विचार केला. त्याने त्या भावा बहिणीला आनंद तर दिलाच पण त्याचबरोबर त्यांना जगण्याचा एक मोठा संस्कार दिला. या दुकानदाराचे अनुकरण आपणही करायला हवे. कधी ना कधी आपला चांगुलपणा अनेकपटीने आपल्याकडे परततो यावर आपण विश्वास ठेवायला हवा.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..