नवीन लेखन...

सुविचार

जीवनात जर माणूस यशस्वी झाला तर तो समृद्ध होतो व सुख त्याच्या मागे लागते हे पल्याला मोठ्या लोकांच्या (मोठी झालेली लोकं) यांच्या वागणुकीतून दिसते. म्हणून यशस्वी व समृद्ध व सुखी होण्यासाठी आपणास माहिती असणारीच जीवन उपयोगी सूत्रे मी संकलीत केली आहेत. ती मी तुमच्या पुढे ठेवत आहे. ती तुम्ही वाचाल याची मला खात्री आहे.

१) कान हे दुसऱ्यावर विश्वास ठेवतात पण डोळे स्वतः वर विश्वास ठेवतात.
२) सुख मानण्यात नसून ते दुसऱ्याला देण्यात आहे. कारण आपण जे देतो ते शतपटीने परत येते.
३) नशीबाचे दुसरे नाव विचार आहे.
४) जीवन शैली स्वतः घडवणे म्हणजे खरा आनंद.
५) तीन गोष्टी देत रहा – मान, दान आणि ज्ञान.
६) माणसाची वृत्ती त्यांच्या विचारांचा आरसाअसतो.
७) सुप्त चैतन्य आणि निद्रीस्त शक्ती जागृत करण्याचे साधन म्हणजे शिक्षण होय.
८) यशाकडे वाटचाल करण्यासाठी सद्वर्तन हा पहिला टप्पा आहे.
९) स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बना व जगण्याचा आनंद लुटा.
१०) उपदेश आणि विचारवंत व्हा, पण सर्वप्रथम आचारवंत व्हा.
११) दुसऱ्याचे गुण जर स्वतः अंगी बाणवता येत असतील तरच तुम्ही सुखी जीवन जगण्यास लायक आहात.
१२) कोणतीही गोष्ट खट्टास आणि मिट्टास घेऊन येते.
१३) ज्याला छोट्या छोट्या गोष्टीबद्दल ज्ञान असते त्यालाच विद्वान म्हणतात.
१४) करारी वृत्तीने ध्येयासाठी झटले तर यश आपलेच असते.
१५) अर्धवट ज्ञानी हा दुःखाचा धनी असतो.
१६) वेळ आणि संधी आपल्या कर्तबगारीने आणा.
१७) कुशलता आणि आत्मविश्वास हेच खरे अजिंक्य सैनिक आहेत.
१८) कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडी सुद्धा बाकी ठेवू नका.
१९) लबाडी ही आखूड चादर आहे जी तोंडावर ओढली असता पाय उघडे पडतात.
२०) माणसाची थोरवी त्याच्या गुणांनी ओळखावी, त्याच्या अवगुणांनी नाही.
२१) स्वत: अचूक होण्यापेक्षा दुसऱ्यावर टीका करणे सोपे असते.
२२) शेवटी हुशारी थोड्या फार फरकाने सर्वांना सारखीच असते फरक असतो तो स्वभावात.
२३) जगातील साऱ्या संपत्तीपेक्षा माणसेच अधिक मोलाची असतात.
२४) स्वार्थ हा माणसाचा स्वार्थी भाव आहे. पण स्वार्थ जेव्हा प्रामाणिकपणा व कर्तव्यापेक्षा मोठा होतो तेव्हाच पैशाच्या झऱ्याला पाणी लागते.
२५) कर्म जर चांगले असेल तरच कर्तृत्वाला झळाळी येते.
२६) जिथे पारदर्शकता असते तिथे भीतीचा लवलेश नसतो.
२७) मनाची एकाग्रता हेच यशाचे गमक आहे.
२८) आजचा यजमान हा उद्याचा पाहुणा असतो.
२९) दुःखाची आवड असणाऱ्या माणसापासून दूर रहा कारण तो एक साथीचा रोग आहे.
३०) अति सुखाच्या हव्यासातून शोकांतिका घडते.
३१) आपल्या सवयी आपल्यावर राज्य करतात.
३२) प्रामाणिक पणाने दिलेली सेवा प्रति फळाने वंचित रहात नाही.
३३) विद्यार्थी तयार झाल्यावर शिक्षक तयार होतो.
३४) माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.
३५) सोपी होण्याआधी प्रत्येक गोष्ट कठीण असते.
३६) यशाला वाटेकरी असतात पण अपयश हे अनाथ असते
३७) वेळ धावत आहे सदुपयोग करा. वेळ वाया आयुष्य वाया.
३८) योजना आखण्यासाठी खर्च केलेला एकेक मिनिट ती योजना अंमलात आणण्याच्या वेळी दहा दहा मिनिटे वाचवतो.
३९) दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे फारच सोपे असते. पण दुसऱ्याच्या आनंदात निर्मल मनाने समरस होणे ही अवघड कला आहे.
४०) मनाने मोकळा, वृत्तीने उदार आणि विचाराने प्रगल्भ अशा माणसाचा सल्ला तुमचे जीवन घडवू शकतो.

वरील सूत्रे पाळणारी माणसे आपल्या कार्यकारिणीमध्ये आहेत ही माझी खात्री पटली आहे म्हणूनच हा पत्र प्रपंच केला आहे.

मीलन अनंत दिघे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..