आदरणीय पारनाईक सर….

खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . […]

ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार? […]

वाढदिवस की घटदिवस

इंग्रज गेले पण कांही भंपक पध्दती सोडून गेले. कोशल्येने रामाचा वाढदिवस साजरा केल्याची कथा ना वाल्मिकींना सुचली ना गदिमांना सुचली. कॉंव्हेंटमधल्या मुलांना रामनवमी म्हणजे लॉर्ड रामाचा हॅपी बर्थडे येवढेच शिकवले जाते. […]

इंद्रधनू नभातले…. रंग माझ्या मनातले…

संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात नुकताच पावसाचा शिडकावा पडून गेल्यावर आल्हाददायक गारवा निर्माण झालाच होता, स्वच्छ सुंदर वातावरणात परत उन्हाची कोवळी किरणे पसरू लागली आणि काय आश्चर्य! छान इंद्रधनुष्य आकाशात उमटले, तसे कावेरीबाईं आनंदीत झाल्या अनेक वर्षांनी आज असा योग आला होता. आकाशातील इंद्रधनू पाहाणे त्यांना फार आवडत असे. तसेच आजही त्या मोहीत झाल्या आणि खिडकीतून बाहेर निरखून […]

बेंगलोरमधली खवय्येगिरी

मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं. […]

आज्जीची माया

खूप सुंदर असतं घरात आज्जी असणं. घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. तिच्या पदराआड दडलं की कसं सुरक्षित वाटतं. वेगळेच संस्कार होतात मनावर तिच्यासोबत असलं की. तुम्ही चुकलात तर प्रेमाने तुम्हाला ओरडेल, रोज संध्याकाळी देवासमोर बसून शुभंकरोती म्हणवून घेईल, मनाचे श्लोक पाठ करून घेईल, लाडू वळले की पहिला तुम्हाला देवासमोर ठेवायला लावेल आणि दुसरा तुमच्या हातात देइल, तुमचा हात हातात घेउन मंदिरात नेइल आणि तुम्ही परत निघताना निरोप घेत तुमचा गोड पापाही घेईल. […]

मी आणि चंद्र

रात्रीची आल्हाददायक झुळूक हळूच मला खुणावते आणि मी नकळत तुझ्याकडे वळते. आणि तुझ्या शीतल छायेत आल्यावर माझ्या अंगावर चांदण्याची फुलं बिनधास्त उधळतोस तू.. […]

ग्रीष्माचे दोन रंग

मार्च महिन्याच्या सुरवातीस थंडीचा कडाका ओसरू लागतो. हवेत सुरेख गारवा येऊ लागतो.  स्वेटर रजया बासनात गुंडाळून ठेवल्या जातात.पंख्याचा वेग वाढला जातो. एप्रिलच्या सुरवातीस   कूलर खिडक्यावर विराजमान होतात. सकाळी दहानंतर घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसतं. प्राणी,पाखरे सावलीचा आधार शोधतात. सगळीकडे रखरख वाढू लागते. सूर्य आग ओकू लागतो.वारासुद्धा तापू लागतो.अंगाची काहिली होऊ लागते. सारीकडे वैराण भासू  लागते. उन […]

कोरोनास पत्र

तू एकमेव असा जीव नाहीयेस जो मानव जातीवर संकट बनून चालून आलास. तुझ्या आधीही तुझ्या सारखेच काही सूक्ष्म जीव संकट बनुन प्रहार करत होते पण वेळोवेळी मानवाने त्या सर्वांना मात दिली. त्यामुळे तुलाही एक दिवस हार पत्करावी लागणार हे नक्की. […]

पाय खेचण्याची स्पर्धा!

ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते. […]

1 2 3 84
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..