नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

जेष्ठ अभिनेत्री  शांता जोग यांचा

वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. […]

अनेक भाषांत लिहिणारे पंजाबी साहित्यिक कर्तारसिंग दुग्गल

अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. […]

डॉ. रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपूरी

फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला. […]

मराठी अभिनेते यशोधन बाळ

यशोधन बाळ यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे येथे, व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज मध्ये झाले. कॉलेज मध्ये असतानाचा फिरोदिया करंडकात चमक दाखवून यशोधन बाळ यांनी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरवातीच्या काळात १९८१ ते १९९५ मध्ये केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत होते. […]

संगीतकार व गायक  शंकर महादेवन

प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. […]

विनोदी अभिनेते व निर्माते जसपाल भट्टी

बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. […]

गुजराती संगीत दिग्दर्शक आणि गायक निनू मजुमदार

निनू मझुमदार हे गुजराती संगीतातील एक मोठे नाव होते. निरंजन मुजुमदार हे निनू मुजुमदार यांचे पूर्ण नाव.ज्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून २० हिंदी चित्रपट केले, त्यांनी २८ हिंदी चित्रपट गाणी गायली. त्यांचे वडील नागेंद्र मुझुमदार हे मूकपटाच्या युगातील नाटककार आणि दिग्दर्शक होते. […]

मराठी अभिनेता दिग्दर्शक लोकेश गुप्ते

लोकेश गुप्ते हे नाव छोट्या पडद्यावर तसेच चित्रपट नाटकांतून अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. लोकेश गुप्ते ह्यांच्या अभिनयाची सुरूवात विनय आपटे ह्यांच्या अभिनेत्री नाटकांना झाली. […]

मिनीस्कर्टच्या जनक डेम मेरी क्वांट

डेम मेरी क्वांट या फॅशन जगतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होत्या. डेम मेरी क्वांट या मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जातात. […]

क्रांतिवीर देशभक्त भार्गव महादेव उर्फ बाबा फाटक

बाबा फाटक यांचा जन्म दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडील महादेव उर्फ बाळशास्त्री, आई गंगा व भावंडे कै. वेणू, गोपाळ,वासुदेव व विष्णू ही सगळीच मंडळी देशप्रेमी. नाशिक येथे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे बाळशास्त्रीचें स्नेही मित्र. […]

1 2 3 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..