चित्रपट निर्माती व पार्श्व गायिका व सुपरस्टार, मेगास्टार, जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या थलायवा रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांचा जन्म तामिळ कुटुंबात चेन्नई येथे २ मार्च १९५८ रोजी झाला.
लता रंगाचारी हे त्यांचे लग्नाच्या आधीचे नाव. त्यांनी चेन्नईच्या इथिराज कॉलेज फॉर वुमनमधून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे.
१९८० च्या दशकात, लता यांनी तमिळ सिनेमात पार्श्वगायिका म्हणून काम केले. टिक टिक टिक (१९८१), अनबुल्ला रजनीकांत (१९८४) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काही गाणी गायली. रजनी 25 (१९९९) या संगीत अल्बम मध्येही त्यांनी योगदान दिले ज्यात रजनीकांतच्या कारकिर्दीची २५ वर्षे साजरी केली गेली होती. लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे.
रजनीकांत व लता यांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. पण आजही त्यांचे प्रेम तितकेच नवे आहे, जसे पूर्वी होते. १९८० मध्ये रजनीकांत लता यांना पहिल्यांदा भेटले आणि पहिल्याच भेटीत त्यांना प्रेम झाले. १९८० साली रजनीकांत आपल्या ‘थिल्लू मल्लू’ या चित्रपटाचे शूटींग करत होते. १९७९ मध्ये आलेल्या ‘गोलमाल’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक असलेला ‘थिल्लू मल्लू’ हा रजनीकांत यांचा पहिला कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटदरम्यान रजनीकांत यांना मुलाखतीसाठी विचारणा झाली. चेन्नईतील वुमन कॉलेजच्या एका मॅगझिनसाठी ही मुलाखत होणार होती. कॉलेजची लता रंगाचारी ही मुलगी ही मुलाखत घेऊ इच्छित होती. रजनीकांत या मुलाखतीसाठी तयार झाले आणि लता मुलाखतीसाठी पोहोचली. या मुलाखती दरम्यान रजनीकांत यांनी लता यांना पहिल्यांदा पाहिले आणि या पहिल्या भेटीतचं ते लता यांच्या प्रेमात पडले. मुलाखती दरम्यान रजनीकांत व लता दोघेही कमालीचे कम्फर्टेबल होते. याचे कारण म्हणजे दोघांचे बेंगळुरू कनेक्शन. चित्रपटांत येण्यापूर्वी रजनीकांत यांनी बेंगळुरू येथे बस कंडक्टरची नोकरी केली होती आणि लता यांचे घर बेंगळुरूलाच होते. या पहिल्या भेटीतचं लता हीच आपली ‘सोलमेट’ असल्याचे रजनीकांत यांना जाणवले. मुलाखत संपली आणि मुलाखत संपताच रजनीकांत यांनी लता यांना लग्नासाठी प्रपोज केले. लता यांच्यासाठी हा सुखद धक्का होता. लग्नासाठी तुम्हाला माझ्या आईवडिलांशी बोलावे लागेल, असे त्या म्हणाल्या. पण रजनीकांत यांनी त्याआधी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २६ फेब्रुवारी १९८१ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे त्यांनी लग्न केले. या दाम्पत्याला सौंदर्या आणि ऐश्वर्या अशा दोन मुली आहेत. लता या रजनीकांत द्वारा संचालित एक स्कूल ‘द आश्रम’च्या संचालिका आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply