पहिले विद्युत वाहन
पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या. […]