नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

मराठी सॉफ्टवेअरमधील प्रमाणीकरण – समस्या आणि उपाययोजना

भारतीय भाषांचा संगणकावर उपयोग गेली वीसहून जास्त वर्षे होत आहे. मात्र दुर्दैवाने सुरुवातीची बरीच वर्षे केवळ डीटीपी म्हणजे मुद्रणविषयक गरजांसाठीच संगणकाचा मराठीत वापर होता. या काळात बर्‍याच तांत्रिक सुधारणा झाल्या. सुरुवातीच्या काळातील सी-डॅक, आकृती, आयटीआर, मॉड्युलर यासारख्या केवळ चारपाच मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्यांच्या जोडीने नवेनवे सॉफ्टवेअर निर्माते या क्षेत्रात येउ लागले. आपआपल्या परिने सॉफ्टवेअर बनवू लागले. बघताबघता वर्षामागून वर्षे जात होती आणि मोठ्या प्रमाणावर माहितीचा साठा मराठी आणि इतर भाषांमध्ये तयार होऊ लागला. वेगवेगळ्या कामांसाठी हा साठा वापरला जाऊ लागला, अगदी सरकारदरबारी आणि खाजगी क्षेत्रातही. आणि याच सुमारास काही अडचणीही आल्या. काय होत्या या अडचणी? त्या आतातरी दूर झाल्या आहेत का? यावरचे उपाय काय? या सर्वांचा वेध घेणारी ही लेखमाला… […]

दोन सूर्यांचा चमत्कार…… इंटरनेटवरची अफवा (Email Hoax)

गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्‍याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना? […]

1 61 62 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..