नवीन लेखन...

मंदिर संकल्पना आणि तत्वज्ञान

भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो. का उभारली असतील इतकी मंटिरे, ते पण एकाच गावात? सर्वसाधारणपणे सर्व प्राचीन मंदिरे आणि वैभवशाली नगरे नदीच्या काठावर किंवा अगदी जवळच वसल्याचे दिसते. भारतीयांनी फार पूर्वीपासून व्यापार करण्यावर भर दिला. रोम, ग्रीस, बेबिलोन, मेसोपोटेमिया, इजिप्त अशा समकालीन प्राचीन संस्कृतींशी आपण सागरी मार्गाने खूप मोठा व्यापार केला. तसाच देशांतर्गत व्यापारही होतच असे. तो रस्त्यांच्या मार्गाने व्हायचा त्यापेक्षा जास्त प्रमाणात नदीमार्गाने होत असे. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधे त्याने देशभर राजमार्ग बांधल्याचे उल्लेख आहेत. या राजमार्गावर त्याने औषधी वृक्ष लावले आणि मनुष्य तसेच प्राण्यांसाठी पाणपोया, विश्रामस्थाने आणि चिकित्सालये उभारल्याचे म्हटले आहे. त्याच्या वडिलांच्या काळातील कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथामधेही राजाने दळणवळणासाठी लहानमोठ्या रस्त्यांचे काम करावे असे म्हटले आहे. असे राजमार्ग ज्या नगरांमधून जातात तिथे मंदिरे उभारल्याचे दिसते. नदीतून जड सामानाची वाहतूक करणे, दोन्ही तीरांवरच्या नगरांमधे वस्तूंची देवाणघेवाण करणे सोपे होते. स्स्त्यांपेक्षा नदी मार्ग अधिक सोयीचे, कमी श्रमाचे आणि वेगाने बाहतूक करणारे होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथातही राजाने नदीमार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर कसा कर लावावा याचे मार्गदर्शन आहे. तसेच नदीतून लढणारी नोसेनाही असावी, असा सल्ला कौटिल्य देतो. कावेरीपट्टन (तमिळनाडू), मछलीपट्टन (आंध्र प्रदेश), ताम्नलिप्ती (प. बंगाल), द्वारका, प्रभासपाटण (गुजरात) अशी कितीतरी बंदरे आणि व्यापारी महानगरे भारतभर होती. त्यांची उत्खननेही झाली आहेत. अशा सर्व शहरांमधे मोठमोठी मंदिरे आहेत. मंदिर उभारणीचा इतिहास आणि वैचारिक भूमिका यांची थोडक्यात ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जगभरात सर्व धर्मपंथांमधे मंदिर ही पितरांच्या पूजेतून आलेला स्मृतिमंदिर हा एक प्रकार. इजिप्तचे पिरॅमिड, भारतातले स्तूप, समाधी, छत्री हे सर्व प्रकार स्मृतिमंदिर गटातले. दुसरा प्रकार सामुदायिक प्रार्थनास्थान. तेथे सामुदायिक प्रार्थना केली जाते. चर्च, चैत्य आणि मशिदी अशा वास्तूमधे एकत्रित प्रार्थना होते. मात्र तिथे देवाचे अस्तित्व प्रतिक रुपात दाखवले जाते. तिसरा प्रकार म्हणजे देवालय किंबा देवाचे घर स्वरुपातली वास्तू. वास्तविक अगदी इतिहासपूर्व काळापासून, अश्मयुगापासून माणूस मूर्तीची पूजा करत आहे. यात मुख्यतः आदिमातेची पूजा होताना दिसते. अश्मयुगीन मातीच्या मूर्ती जगभर सापडलेल्या आहेत. सुरुवातीला या मूर्तीसाठी देवालय बांधल्याचे पुरावे सापडत नाहीत. हळूहळू निसर्गाच्या विविध घटकांची पूजा करणार्‍या मानवाने त्यांना मानवी रूप दिले. आपल्यासारख्याच भावना, आवडीनिवडी देवाला बहाल केल्या. घरोघरी अशा देवतांची पूजा व्यक्तिगत पातळीवरच केली जाई. एकत्रित, सामाजिक, सार्वजनिक पातळीवर पूजा-प्रार्थना-उत्सव होत असल्याचे स्पष्ट पुरावे नाहीत. वैदिक काळात मात्र निसर्गाच्या विविध घटकांची प्रत्यक्ष पूजा करण्यासाठी यज्ञांची कल्पना केली गेली. खरे तर यात अग्नी हा सर्वात प्रमुख, महत्त्वपूर्ण देव होता. देव आणि मानव यांच्यातला दुबा होता. आपल्याला जसे अन्न, वस्त्रे लागतात तसे देवालाही लागत असणार, असा विचार करून आपण देवाला नैवेद्य, वस्त्र आणि फुलांची पूजा अर्पण करू लागलो. आपल्याला घर आहे, तसे देवालाही स्वतंत्र घर असावे ही कल्पना आपल्या मनात आली आणि देवालय तयार झाले. (आंध्र सुमारे इ.स.

पूर्व २०० च्या दरम्यान बांधलेल्या मंदिरांचे अवशेष काही ठिकाणी सापडले आहेत. तक्षशिला, स्वात (पाकिस्तान), बैराट, नगरी (राजस्थान), बेसनगर (मध्य प्रदेश), मुझिरीस (केरळ), प्रदेश), किझाडी (तामिळनाडू) अशा कितीतरी ठिकाणी इसवीसनाच्या आधीच्या काळात उभारलेल्या मंदिरांचे अवशेष दिसतात. सुरुवातीला लाकूड, विटा, मातीचा बापर करून अर्धगोलाकार किंवा चौरस मंडपासारखी मंदिरे बांधली गेली. इ.स. तिसर्‍या चौथ्या शतकापासून गुप्त घराण्याच्या राज्यकाळात दगडाची बांधीव मंदिरे घडवली गेली. मध्य प्रदेशात सतना गावाच्या परिसरात सुमारे ४० मंदिरांचे अवशेष दिसतात. तसेच सांची स्तूपाच्या जवळ, विदिशा, उदयगिरी येथेही गुप्तांनी मंदिरे बांधली, उत्तर प्रदेशात ललितपूर, कानपूर शहराच्या परिसराही गुप्तांच्या काळातली मंद्रि आहेत. महाराष्ट्रात दगडाचे पहिले बांधीव मंदिर नागपूरजबळ रामटेकला महाराणी प्रभावती गुप्त हिने इ.स. चौथ्या शतकात बांधले. नागपूरजवळ कुही तालुक्‍यात मांढळ, रामटेकजबळ नगरधन आणि मनसर, धाराशिव (उस्मानाबाद) जवळ तेर येथेही इ.स. चौथ्या ते सातव्या शतकातील महाराष्ट्रातील आद्य मंदिरे सापडली आहेत. मात्र ती पूर्ण दगडी नसून बिटा, माती, चुना, लाकूड आणि टगडांचा बापर करून बांधली आहेत. कर्नाटकात ऐहोळे, महाकूट येथेही इ.स. पाचव्या सहाव्या शतकातील पूर्ण दगडी बांधीव मंदिरे आहेत. प्राचीन संस्कृत साहित्यातही मंदिरांचे भरपूर उल्लेख येतात. सुरुवातीला बांधलेली मंदिरे संथागार या स्वरूपाची आहेत. एका मोकळ्या सभागृहात मागच्या भिंतीपाशी देवाची मूर्ती आणि समोर मोकळी जागा असे हे मंदिर असल्याचे दिसते. या मोकळ्या दालनात गावकरी एकत्र जमून पुराणिकांकडून कथा ऐकत असत. भजन, कीर्तन, गायन, वादन नृत्य सादर करण्यासाठी या संथागारात लोक येत असत, अवर्षण, पूर, युद्धाचे दिवस अशा प्रसंगी राजाकडून येणारे संदेश गावऱ्यांना समजावण्यासाठी या संथागारात अधिकारी सभा घेत असत. गावातून येजा करणारे यात्रेकरू, वाटसरू, व्यापारी अशा प्रवाशांच्या रात्रीचा मुक्काम या संथागारात होत असे. इक्ष्वाकु गुप्त, सातबाहन यांच्या नंतर चालुक्य, चोल, कदंब, पल्लव, परमार, काकतिय, सोळंकी, होयसाळ, पाल, प्रतिहार, चंदेल, पाइय, वर्मन, बॉण, विजयनगर अशा कितीतरी राजघराण्यांनी उत्तमोत्तम, भव्य मंदिरे देशभर उभारली. मंद्र संकल्पनेत उत्तरोत्तर प्रगती होत गेली. साधारण सभागृहाऐवजी आता देव प्रतिमा स्वतंत्र गाभाऱ्यात प्रतिष्ठापित केली गेली. देव आता राजाप्रमाणे प्रसादात राहू लागला. राजाप्रमाणेच, देवाच्या जीवनाशी निगडित प्रसंग साजरे होऊ लागले. जेवण (नैवेद्य), झोपणे (शेजघर), मनोरंजन (नृत्य, गायन, नाट्य) अशा विविध दैनंदिन आणि नैमित्तिक उपचारांची योजना होऊ लागली. देशाची आर्थिक स्थिती अधिकाधिक उत्तम होऊ लागली. त्यामुळे स्थापत्यशास्त्र विकसित होऊ लागले. आता मंदिराचा आकार वाढला. परिसर विस्तृत झाला. विद्वान, विचारवंत मंडळीनी मंदिराचा ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला. स्थपतींनी त्यानुसार बांधकाम, शिल्पकाम केले. काळाच्या ओघात वेगवेगळ्या इमारतींची भर पडत गेली. देवाच्या पूजा उपचारांमधे अंगभोग आणि रंगभोग आवश्यक, अनिवार्य असतात. अंगभोग म्हणजे मूर्तीचे स्नान, चंदनाची उटी, वस्त्र, हार, फुले, दागिने, नैवेद्य वगैरे शारीरिक उपचार. रंगभोग म्हणजे देवाच्या मनोरंजनासाठी केले जाणारे भजन, कीर्तन प्रवचन असे संगीत नृत्यमय कार्यक्रम अशा कलात्मक सादरीकरणासाठी मंदिराच्या आवारात नृत्य मंडप उभारले जात. नगरातील लोक संगीत, नृत्य, गायन, वादन, चित्रकला प्रदर्शन, नाटकांचे प्रयोग करण्यासाठी मंदिराच्या आवारातील नृत्य मंडपाचा वापर करत असत. अनेक दर्जेदार नाटकांचे लेखन संस्कृत आणि प्राकृत भाषांमधे झाले आहे. त्यांचे सादरीकरण या नृत्य मंडपांमधे होत असे. शास्त्रीय नृत्य आणि संगीताची परंपरा भारतात खूप प्राचीन, तितकीच समृद्ध आहे. अशा सर्व कलांचे कार्यक्रम मंदिरांच्या नृत्य मंडपात होत असत. देवाचे उत्सव, जन्मोत्सव, विवाहोत्सव यांच्यासाठी मंदिराच्या आवारात कल्याण मंडप उभारले जात. यात नगरातील सर्वांचेच लग्न, ब्रतबंध, नामकरण वगैरे सोहळे साजरे करण्याची प्रथा होती. अशा कार्यक्रमात पाहण्यांना जेबण देण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी भोग मंडप उपयोगी पडत असत. देवाचा नैवेद्य शिजवण्यासाठी उभारलेल्या भोग मंडपाचा नागरिकांनाही उपयोग होत असे. मंदिराच्या आवारात धर्मशाळा असत. पांथस्थ, यात्रेकरू, व्यापारानिमित्त फिरणारे तांडे आणि सार्थबाह अशा प्रवाशांना मंदिराच्या आवारातील धर्मशाळेत, ओसरीवर मुकाम करता येत असे. त्यांच्या जेबणाची सोयही या भोग मंडपात होत असे. मंदिराच्या आवारात पाठशाळा भरत असत. गावाच्या वेगवेगळ्या भागातील मंदिरांमधे चालणार्‍या पाठशाळा सर्वासाठी मोफत, खुल्या असत. मंदिरांच्या परिसरात लोकांचा सतत राबता असल्याने त्या परिसरात बाजारपेठा वसबल्या गेल्या. जवळच्या नदीतून वाहतूक होत असे. राजमार्गही मंदिराच्या नगरातून जाताना दिसतात. आजच्याप्रमाणे पूर्वीही सामानाची वाहतूक करण्यासाठी ट्रान्सपोर्ट कंपन्या होत्या. त्यांना सार्थवाह म्हणत. तयार उत्पादने, कच्चा माल एका गावाहून दुसर्‍या गावाला नेण्याचे काम ते करत. दूरच्या ठिकाणी जाताना वाटेत रात्र झाली की सार्थवाह मंदिरांमध्ये मुक्काम करत. तिथल्या भोगमंडपात भोजनाची सोय होत असे. मंदिरांच्या परिसरात ‘हॉस्पिटलदेखील उघडले जात. वैद्यकीय अधिकारी नेमले जात. स्त्री वैद्यांची नेमणूक केल्याचेही दाखले आहेत. या इस्पितळांमधे औषधे आणि उपचार पूर्णपणे मोफत होत असत. मंदिराच्या आवारात न्यायालय भरवावे, असा सल्ला कौटिल्याने दिला आहे. अनेक मंदिरांवर विविध कालखंडातील शेकडो शिलालेख कोरलेले आढळतात. त्यामध्ये ही सर्ब माहिती दिलेली आहे. मंदिर ही केवळ धार्मिक उद्देशाने बांधलेली इमारत नसून ते त्या नगरीच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक घडामोडींचे केंद्र असे. जितकी लोकसंख्या जास्त, जितके उपक्रम आणि दळणवळण जास्त, तितकी मंदिरे जास्त म्हणूनच काही प्राचीन नगरांमध्ये खूप जास्त संख्येने मंदिरे उभारलेली दिसतात. मयमत, शिल्परत्न, हयशीर्षपंचरात्र आणि अग्नी पुराणात मानवी देहाप्रमाणे मंदिराची कल्पना केली आहे. गोपूर किंवा प्रवेशाची कमान म्हणजे पाऊल, प्रकार म्हणजे माड्या, पायर्‍या म्हणजे मंदिर रूपी मानवाचे पाय, कलश म्हणजे केस. आमलक म्हणजे मस्तक, कंठ म्हणजे गळा, शुकनास म्हणजे नासिका, वेदी म्हणजे खांदे, ध्वज म्हणजे प्राण तर सभामंडप म्हणजे डावी उजबी कुस असल्याचे म्हंटले आहे. गाभारा म्हणजे गर्भगृह तर देवविग्रह म्हणजे मंदिर रूपी मानवाचा आत्मा आहे.

अशा परिपूर्ण मंदिराला मसमरांगण सूत्रधार या ग्रंथात प्रासाद म्हंटले आहे. प्रासाद म्हणजे महाल, राजवाडा! यात राहणारा देव म्हणजे जणू राजाच. मंदिरात जाताना भोवतीच्या जगापासून थोडे वर, उन्नत पातळीवर जावे लागते. काही पायऱ्या चढून आपण वर अधिष्ठानावर येतो. इथून मंदिराच्या बाह्य भिंती दिसतात. बाहेरून मंदिरावर दैनंदिन जीवनातील प्रसंग, प्राणी, पक्षी, वेगवेगळी कार्मे करणारी माणसे, पौराणिक कथांवर आधारित शिल्पे दिसतात. ही सगळी जीवनातली सुखदुःखे बाहेर ठेवून आपण मंदिरात प्रवेश करतो. इथे सभामंडपात दिसतात व्यंतर देवता (त्रिलोकात संचार करणाऱ्या पिशाच भूत, यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, किंपुरूष, महोराग या आठ प्रकारच्या देवदेवता), यक्ष, गंधर्व, अष्टटिक्पाल आणि गाभाऱ्यातील देवाच्या लीला दाखवणारी शिल्पे असतात. जणू आपण स्वर्गात आलोय, असा आभास होतो. आता येतो आपण टेवाच्या दाराशी, देवलोकात. जीवनाचे मोह, मायापाश बाहेर राहिलेले आहेत आणि आपण देवलोकातून पुढे चालू लागतो. पुढे येतो अंतराळ. गाभारा आणि सभामंडप यांना जोडणारी अरुंद जागा म्हणजे अंतराळ. अंतराळात दिवस, रात्र नसतात. गुरुत्वाकर्षण नाही की हवेचा दाब नाही. तिथे ना सुरुवात आहे ना शेवट. समोर आहे गाभारा. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असतात गंगा यमुना या नदी देवतांच्या मूर्ती. त्यांच्या दर्शनानेच आपण अंतर्बाहय पवित्र होऊन जातो. कीर्तिमुखे असलेला उंबरठा म्हणजे जणू काळाचा अडसर. काळाच्या मर्यादा ओलांडून आपण आत गाभाऱ्यात जातो. गर्भगृह म्हणजे आपला नवा जन्म होण्याची जागा. इथे परमेश्वर मूर्ती रूपात असतो. अंधारात समईच्या मंद प्रकाशात आपण देवाकडे पाहतो. आपल्यासारखेच रूप पाहून जाणवते सो5हम्‌! परमेश्वर आपल्यासारखा आहे, आपण त्याच्यासारखे आहोत, ही जाणीव, अनुभूती म्हणजे ब्रह्मतत्त्वाचे आकलन. हाच खरा मोक्ष आणि मुक्ती! हिंदूंच्या मंदिरांमधे भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याचा मार्ग दाखवला गेला. इंजिनीअरिंग, आर्किटेक्वर, जिऑलॉजी, जॉमेट्री, मॅथेमॅटिक्स, इकॉनॉमिक्स अशा इंग्रजी नावांच्या विषयांचे ज्ञान प्राचीन मंदिरांच्या उभारणीत प्रत्यक्ष वापरल्याचे दिसते. राजसता आल्या आणि गेल्या. पण मंदिरांचे संरक्षण, जतन, संवर्धनासाठी सर्वांनीच सहकार्य केले. कारण अर्थातच मंदिरांचे भारतीयांच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान! आणि याच कारणामुळे मुस्लिमांनी मंदिरांवर आक्रमणे केली. त्यांना इथली समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सामाजिक जीवनाची घडी मोडायची होती. हजार वर्षे आपण मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांशी लढून जीव वाचवत आहोत. सर्वांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक उद्देशांनी एकत्र येण्याचे हे पवित्र स्थान आहे. आता नव्या काळाप्रमाणे आपण विचारपूर्वक मंदिरांचा उपयोग हिंदू समाजाचे संघटन आणि प्रबोधनासाठी केला पाहिजे.

क्रमशः पुढील अंकात बाचा आधुनिक काळात मंदिरांची जबाबदारी आणि कर्तव्य यासंबंधी काही मुद्दे.

डॉ. भाग्यश्री पाटसकर
४०२/ बीर, गंगाधाम फेज वन, मार्केटयार्ड, पुणे-३७
Email : bhagyashreepataskargmail.com

विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..