नवीन लेखन...

मंदिर संकल्पना आणि तत्वज्ञान

भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो. […]

अर्थव्यवस्थेसाठी हिंदू मंदिरे का महत्त्वाची आहेत?

भारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे. […]

महर्षी  वाल्मिकी

महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी  हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही. […]

रामायण – नेतृत्व गुणधर्म

रामायण हा भारताचा गौरवशाली इतिहास आहे. देव, नर, वानर, राक्षस ह्या सर्व मानव जातीच होत्या. त्यांच्यामधील परस्पर संबंध, रावणाची दहशत, त्या दहशतीचा कायमचा नि:पात करण्यासाठी राम जन्माला येण्यापूर्वीच त्याकाळच्या सक्रिय ऋषीवृंदाने केलेला रावण वधाचा संकल्प व ह्यासाठी एकत्र येऊन कोणी कोणी काय काय करायचे या तपशीलासह केलेली योजना व रामाच्या माध्यमातून तो रावणवध प्रत्यक्ष घडवून आणणे हे सर्व त्यावेळच्या जागतिक राजकारणाचे रोमहर्षक वर्णन वाल्मीकिंनी रामायणात केलेले आहे.  […]

कौल रघुनाथाचा

कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे. […]

श्रीराम कथा सदा विजयते

अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे. […]

वनवासींचे राम

आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते. […]

श्रीराम – सामाजिक समरसता

संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..