नवीन लेखन...

विचारांची दिशा

कॉलेजमध्ये एक प्राचार्य मुलांना फिलॉसॉफी शिकवत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले “जगात देव आहे काय? तुमची श्रध्दा त्याच्यावर आहे काय?” सगळ्यांनी होकारार्थी माना डोलाविल्या.

प्राचार्यांनी पुढचा प्रश्न विचारला “हे जग देवाने निर्माण केले आहे यावर तुमचा विश्वास आहे का? ” विद्यार्थ्यांनी पुन्हा आपला होकार दिला.

प्राचार्यांनी विचारले “जगात जी वाईट शक्ती आहे ती ही देवानेच बनविली आहे काय? ” विद्यार्थ्यांना याचे उत्तर सुचेना. तेवढ्यात एक तेजस्वी मुलगा उभा राहिला आणि म्हणाला “आपण विचार करायला चुकतो आहोत सर, आपल्याला थंडी वाजते परंतु ती दिसत नाही. हे खरे आहे ना? ”

प्राचार्य म्हणाले “तुला काय म्हणायचे आहे? ” विद्यार्थी म्हणाला “उष्णतेचा अभाव म्हणजे थंडी. तो पुढे म्हणाला, जगात अंधार आहे काय?

” प्राचार्य म्हणाले “अर्थातच.” विद्यार्थी म्हणाला “नाही सर, उजेडाचा अथवा उर्जेचा अभाव म्हणजे अंधार. अंधाराला स्वतःचे अस्तित्व नाही.

” प्राचार्यांसकट सगळा वर्ग त्या विद्यार्थ्याने सांगितलेल्या तर्काचा विचार करु लागला. तो विद्यार्थी पुढे म्हणाला “आता मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. जगात वाईट शक्ती अथवा वाईट वृत्ती आहेत काय? यावर माझे उत्तर नाही असे आहे. ”

वर्गातले सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. जगात वाईट शक्ती तर निश्चित आहेत हे सर्वांनाच माहित होते. मग हा मुलगा वेगळे का बरे बोलतो आहे? हे त्यांना कळेना.

तो मुलगा म्हणाला “वाईट शक्ती अथवा वाईट वृत्ती जगात नाहीत. प्रेमाचा, विश्वासाचा आणि करुणेचा अभाव म्हणजे वाईट शक्ती. या जगात कोणीच वाईट म्हणून जन्म घेत नाही. जन्मलेला प्रत्येक जीव परमेश्वराचा अंश घेऊन जन्माला येतो. त्याच्यात जेव्हा मी म्हणालो तसे उदात्त भावनांचा अभाव निर्माण होतो त्यावेळेला आपल्याला वाटते की हा माणूस वाईट विचारांचा अथवा वाईट कृतीचा आहे. खरे तर त्याच माणसाच्या ठायी प्रेम, विश्वास आणि करुणा निर्माण झाली की त्याच्या वाईट वृत्तीचा लोप होतो. हे खरे आहे ना? ”

सगळ्यांनीच त्या मुलाच्या विचारांशी सहमती दर्शविली. प्राचार्य त्या मुलाच्या बुध्दिचातुर्याने चकीत झाले. त्या मुलाचे नाव होते स्वामी विवेकानंद.

श्रध्देच्या आहारी जाण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठ पध्दतीने न्याहाळून आणि त्याचे पूर्ण आकलन करुन त्याचा तार्किक विचार करण्याने अशा प्रकारे विचार करण्याची बुध्दी विकसित होते. तेच नरेंद्रने म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी केले. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांचे विचार भारतभर जनमानसात रुजले. साधु होता होता त्यांना देवत्व प्राप्त झाले ते असे.

आपणही आपली विचार करण्याची पद्धत बदलून बघूया. अधिक वस्तुनिष्ठ पध्दत आपणही अंगी बाळगू या.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..