शैक्षणिक

डिजिटल कचरा

कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते.  प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल. […]

पैसा…. फक्त एक जगण्याचं साधन !

‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो !!! […]

शिक्षणाच्या बाजारीकरणावर शिक्कामोर्तब ?

शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचा शिरकाव झाल्यानंतर काही मोजक्या शिक्षण संस्थांनी व्रतस्थाप्रमाणे विद्यादानाचे पावित्र्य सांभाळले. मात्र बहुतांश शिक्षण संस्था म्हणजे पदव्या मिळवून देणाऱ्या ‘फॅक्टऱ्या’ बनल्या. के.जी. ते पी.जी. चे रेट फिक्‍स करून एकादं प्रोडक्ट विकावं तसं त्यांनी शिक्षण विकायला सुरवात केली. याचे दुष्परिणाम म्हणजे, पाण्यासारखा पैसा ओतून पदव्या मिळवाव्या लागत असल्याने पदवी घेऊन फक्त पैसे कमविण्याचाच विचार बहुतांश विद्यार्थी करतात. त्यामुळे, शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार असलेले मंदिर असते. विद्या हे दान आहे, ती काही विकण्यासाठी ठेवलेली वस्तू नाही, असा युक्तिवाद केला जात असला तरी, शिक्षणाचा बाजार भरवला गेलाय, हे वास्तव आहे. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ६

मलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत. […]

नीट (NEET) परिक्षेच्या उत्तराची भाषा

महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन ! […]

मनाची श्रीमंती

माझ्यामते मुबलक पैसा कमविला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असे नाही. खरं तर फक्त पैसा कमविला की तो “पैसेवाला” नक्कीच होतो, मात्र “श्रीमंत” होतोच असं नाही. कारण प्रत्येक “श्रीमंत” हा पैसेवाला असतोच परंतु प्रत्येक “पैसेवाला” हा श्रीमंत असतोच असे नाही. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ५

अलेक्झांडर द ग्रेट, मंगोल राजा चेंगिजखान, सुलतान महमद तुघलक वगैरे मलेरियाला बळी पडलेल्या काही प्रमुख व्यक्ती. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ४

क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकन यादवी युद्ध काळात ५० टक्के गोरे ८० टक्के नागरिक मलेरियाग्रस्त होते. […]

‘नॅक’चे शिवधनुष्य

जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल. […]

अंधश्रध्दा निर्मूलन : प्रश्न, आक्षेप, मर्यादा व अपेक्षा

आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको. […]

1 2 3 44