नवीन लेखन...

महाराष्ट्रातील विविध संस्थांची माहिती देणारा विभाग

खल्वायन रत्नागिरी, सादर करीत आहे …

असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात. हे आजचं नाही . गेली २५ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते . […]

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. […]

संगीताचं विद्यापीठ – गांधर्व महाविद्यालय

संपूर्ण पारतंत्र्याच्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची केलेली स्थापना ही एक संपूर्ण स्वतंत्र घटना होती आणि पुढे त्यांच्या शिष्य-प्र-शिष्यांच्या रूपानं आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखांच्या रूपानं हेही दिसून आलं की, या कार्याचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखाच आहे. […]

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  […]

जनता सहकारी बँकचा ७२ वा वर्धापनदिन

आज ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सात दशकाहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेल्या जनता सहकारी बँक पुणे चा वर्धापन दिन. १८ ऑक्टोबर १९४९ रोजी समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनता बँकेची स्थापना झाली. […]

शिवशंकरभाऊ हा “सेवेकऱ्याचा” प्रवास

मंदिर हे समाज मंदिर कसं होऊ शकतं, बहुदिशांनी समाजासाठी अनेक उपक्रम करताना व्यवस्थापन कसं पारदर्शक ठेवता येतं,’ याचा वस्तुपाठ म्हणजे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान. हा आदर्श निर्माण झाला तो भाऊंचं कुशल नेतृत्व आणि त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्यामुळे. […]

पार्ले टिळक विद्यालयाची १०० वर्षे

‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत. […]

पुण्यातील भारत सेवक समाजाचा वर्धापन दिन – १२ जून

गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. […]

खल्वायन रत्नागिरी

सर्व प्रतिभावान कलाकारांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या संस्थेला वर्धिष्णू स्वरूप लाभावे , बावीस वर्षांपूर्वी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे , तो विशाल व्हावा आणि आसमंत संगीताच्या इंद्रधनुषी रंगाने व्यापून जावा यासाठी , संस्थेचे आद्यदैवत असणाऱ्या श्री नटेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !!! […]

ज्ञान प्रबोधिनी….हिंदू धर्मात सुधारणा करणारी पुण्यातील संस्था

आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींना आपणच मूठमाती द्यायची असते.सुधारणा प्रथम स्वतः पासून आणि आपल्या कुटुंबां पासून करायची असते.याचीच जाणीव झाल्यामुळे कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..