नवीन लेखन...

महाराष्ट्रातील विविध संस्थांची माहिती देणारा विभाग

सहकारी तत्वावरील मासेमारी

महाड जिल्ह्यातील रायगड येथील आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नदीतील मासेमारी. पण नद्यांवर धरणं बांधली गेल्याने तेथील मच्छीमारीवर मर्यादा आल्या. पोटापाण्यासाठी आदिवासी स्थलांतर करू लागला. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्या वेळी कोयनानगर सातारा येथील श्रमजीवी संघटना त्यांच्या मदतीला धावली. मच्छीमारीतून त्यांना उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत त्यांनी विचार सुरू केला. पूर्वी दोन आदिवासी […]

सामाजिक बांधिलकी जपणारी – “फ्रीमेसनरी”

“जगात अनेक सामाजिक संस्था अशाही आहेत ज्या कित्येक वर्षापासून कोणताही अपेक्षेशिवाय व कार्याचा बोलबाला न करता केवळ मानवतेच्या हितासाठी तसंच तळागाळातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द आहेत. “फ्रीमेसनरी” ही ५०० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थापन झालेली आणि भारतात २५० वर्षापासून कार्यरत असलेली सर्वधर्मसमभाव मानणारी आणि समाजहितासाठी तत्पर असणारी संस्था. या संस्थेच्या कामाचं स्वरुप, उद्दिष्टांविषयी माहिती करुन देण्यासाठी नुकतंच मुंबईतल्या फोर्ट येथील “फ्रीमेसन हॉल” येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने भारतात ”फ्रीमेसनरी” चं समाजकार्य कशाप्रकारे सुरु आहे त्याचा हा वेध.” […]

राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे

१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्‍या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. […]

सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची रौप्यमहोत्सवी घौडदौड

युवकांना प्रशासकीय सेवेसंदर्भात अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रशासकीय सेवेमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही संस्था चालविण्यात येते.
[…]

लिव्हिंग फ्री फाऊंडेशन – आवास (व्यसनमुक्ती केंद्र)

माणूस कधीही न संपणार्‍या अडचणींमुळे वाढत्या ताणतणावांमुळे दुःखांमुळे अपमानामुळे, मित्रांच्या आग्रहामुळे, किंवा निव्वळ मजा किंवा कुतूहल म्हणून दारूचा पहिला पेला तोंडाला लावतो आणि बहुतांशी लोकांच्या जीवनाला तो पेला कायमचा चिकटतो. जसे जसे दिवस जातात तसे तसे आई-बाबंच्या अपेक्षा आणि स्वप्ने नातेवाईकांचे सल्लेए जीवलग मित्रांची कळकळ,यांच्यापासून तो फार लांब जातो आणि कुठलाच आवाज अगदी मनाचासुध्दा, त्याला ऐकू येईनासा होतो. […]

एसओएस (SOS) चिल्ड्रेन्स व्हिलेज, परगुरपाडा, अलिबाग

खरी समाजसेवा ही कुठल्याही जात, रंग, धर्म, वंश, प्रादेशिकतावाद किंवा अगदी राष्ट्रवाद या पारंपारिक बंधनांच्या पलीकडची असते. कारण मानव कुठलाही आणि कसाही आणि कसाही असो त्याच्या गरजा आणि समस्या सारख्याच असतात अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आज भारतातील विविध स्तरांमधील लोकांसाठी कार्यरत आहेत, आणि समाजसुधारणा क्षेत्रातील अनेक विकासकामांना आज गती आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. […]

मुक-बधिर शाळा, अलिबाग

कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्‍या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो. […]

प्रथम ट्रस्ट, अलिबाग

अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे. […]

वात्सल्य ट्रस्ट, अलिबाग

ही संस्था अलिबागमधील काही धडाडीच्या महिलांमार्फत चालवली जाते व आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून या महिला, या लहान बाळांच्या जीवनात पहिल्या पावसासारख्या धाऊन येतात. त्यांना त्यांची आई मिळते, आईचं कुठल्याही शब्दात वर्णन न करता येण्यासारखं व कुठल्याही मापात न मोजता येण्यासारख तिच्यासारखचं निर्मळ व निर्भेळ असं प्रेम मिळतं… […]

जनकल्याण समिती, अलिबाग, रायगड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती गेले १२ वर्षे अविरतपणे आदिवासींच्या जीवनात सौख्याचे व आशेचे रंग उधळण्यासाठी झटत आहे व आज इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर व साधनेनंतर या समितीने रायगड जिल्हयात २५० सशक्त आरोग्य रक्षकांची भक्कम फळी उभी केली आहे. हे आरोग्य रक्षक अगदी दुरवरच्या आदिवासी पाडयांमध्ये जातात, भाषेचा अडथळा असून सुध्दा तिथल्या कुटूंबांशी संपर्क साधतात, त्यांच्या अडचणी, समस्या, वेदना, दुःख व त्यांच्या जीवनाचे जळजळीत वास्तव समजावून घेतात, त्यांना आरोग्य विषयक व वैयक्तिक शारिरीक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतात. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..