नवीन लेखन...

सोशियल सर्विस लीग, एक सेवाभावी संस्था

एकोणिसाव्या शतकात नायगाव, परळ, शिवडी, काळाचौकी, भायखळा हा परिसर कापड गिरण्यांनी गजबजलेला होता. स्वत:बरोबरच गावाकडील माणसे प्रपंचाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिळेल ते काम करण्याची, काबाड कष्ट करण्याच्या तयारीने कापड गिरण्यांमध्ये कामासाठी बहुतांश कोकणातील माणसांचा भरणा होत होता. यातील बहुतेक जण कमी शिकलेले आणि गरीब कुटुंबातील होते. त्यापैकी बऱ्याच जणांना दारू, धुम्रपान, तंबाखू चघळण्याची, जुगारासारख्या काही वाईट सवयीही होत्या.

सर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला.

लीगने १९११ पासून मोफत फिरते ग्रंथालय, रात्र शाळा, प्रौढ शिक्षण कार्यक्रम, महिला औद्योगिक शाळा (ISW), असे बहुविध उपक्रम सूर केले. गीरणी कामगारांच्यात स्वच्छता आणि स्वच्छताविषयक मूल्ये बाणावीत म्हणून लीगने खूप कष्ट घेतले. वरील उपक्रम चालविणारी सामाजिक सेवा लीग ही ब्रिटीश कालिनी भारतातील पहिलीच संस्था होती. माहिती, प्रेम आणि सामाजिक सेवा हे लीगचे धर्मतत्व होते.

आजचे सदस्य आणि लीग संबंधीत सर्व सामाजिक कार्यकर्ते श्री एन.एम. जोशी यांनी घालून दिलेल्या त्याच मार्गावर चालत आहेत. सोशियल सर्विस लीगने पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल (मराठी मध्यम) रात्र शाळा, सीबीएसई स्कूल, बालसंगोपन केंद्र, ज्युनिअर कॉलेज आणि पदव्युत्तर पदविका असे उपक्रम सुरु करून त्यांच्या स्वत:च्या संस्थाही वाढविल्या.

सामाजिक सेवा लीगने सुरु केलेल्या रात्र शाळेला ९० वर्ष पूर्ण झाली जी भारतातील सर्वात जुनी आणि प्रथम रात्र शाळा होय. कामगारांच्या ललित कलांना वाव आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी एक सुप्रसिद्ध लोकोपकारी आणि समाजसेवक सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी दामोदर हॉलची उभारणी केली. कामगारांसाठी चिंचपोकळी येथे ग्रंथालय आणि शरीर सवष्ठवाची आवड असणाऱ्या कामगारांसाठी परेल येथे व्यायामशाळा आणि अर्थातच ISW ची स्थापना करण्यात आली.

नशिबाने अगदी सुरुवातीपासूनच, सोसीअल सर्विस लीगला ( एसएसएल) देशातील नामवंतांचे पूर्ण समर्थन, सहकार्य व मार्गदर्शन लाभले. एसएसएलने सामाजिक सुधारणांबरोबर, सर्वसमावेशक विकास आणि महिलांचे सबलीकरण करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली.

प्रामुख्याने त्याकाळातील लोकांचा मनावर एखाद्या गोष्टीवर असलेला पगडा, आंधळा विश्वास, काळी विद्या(जादू) आणि अंधश्रद्धा यातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवक तयार करण्यासाठी, १९२५मध्ये एक सास्थावाचीप्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. अलीकडे तो नाशिक येथे वाय.बी.चव्हाण मुक्त विद्यापिठाशी संल्गन असून तेथे आता “सामाजिककार्य पदव्युत्तर पदवी”, असा कोर्स सुरु आहे.

एसएसएलने मुंबईत १९२४मध्ये देशातील कापड गिरणी उद्योगासाठी प्रशिक्षित कामगार पुरविण्याची पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. एकोणीस आणि विसाव्या शतकात मुंबईतील गिरणीउद्योग यशस्वी होण्यासाठी एसएसएलने मोठया संख्येने प्रशिक्षितकामगारांचा अखंडित पुरवठा केला तेही तितकेच महत्वाचे होते. अलिकडील मुंबईतील कापड गिरण्यांच्या संपामुळे गिरण्या बंद पडू लागल्या आणि एस.एस.एल.ने २०००साली त्या संबंधीत प्रशिक्षण संस्था बंद केल्या.

अशिक्षित आणि गरीब कुटुंबांतून येणाऱ्या मुली व स्त्रियांना त्यांची स्वप्ने पुरी व्हावीत आणि कामगार आणि कुटुंबांना पूरक उत्पन्न मिळवे म्हणून एसएसएलने १९१२साली विविध व्यवहार प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केला. गेल्या काही वर्षांमध्ये बरेच व्यवहारांचे प्रशिक्षण कार्यक्रम जोडले गेले. अशा प्रशिक्षण अभ्यासक्रम महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि आता त्या जोरदार लोकप्रियही होत आहेत.

अलीकडील काळात एसएसएलच्या उपक्रमाचे क्षितीज सातत्याने रुंदावत आहे. जसे सीबीएसई दिल्ली संलग्न एक इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्यासाठी उडी घेतली आहे. या शाळेत कोणत्याही प्रकारची कॅपिटेशन फी घेतली जात नाही आणि त्याउलट फी मध्यम आणि वाजवी आहेत.

एसएसएल समाजात काहीसे दुर्लक्षीत विभागांसाठी उदा. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कार्यक्रम सुरू करण्याच्या योजना आखत आहे. सध्या भेडसावत असलेल्या समस्यांचा सामना आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि त्याच्या निराकरणासाठी एसएसएल समाजातील सर्व थरातून समर्थन, मदत, सहकार आणि मार्गदर्शनाची अपेक्षा ठेऊन आहे.

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..