नवीन लेखन...

फिल्म प्रोजेक्टरचा इतिहास

फिल्म प्रोजेक्टर चा इतिहास मोठा रंजक आहे.

अनेक लोकांनी हलती चित्रे पडद्यावर दाखवू शकेल, असे यंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश छायाचित्रकार एडवर्ड मुयब्रिजने १८७९ साली बनवलेला झूप्रास्किस्कोप, पोलंडच्या प्राझीमिर्झ प्रोझिन्स्कीचा प्लिइओग्राफ, फ्रेंचमन लुईस ली प्रिन्सचा प्रोजेक्टर ही यंत्रे सर्व कमी- अधिक प्रमाणात यशस्वी ठरली.

पहिला यशस्वी फिल्म प्रोजेक्टर फ्रान्सच्या ऑगस्ट व लुईस या दोन ल्युमिअर बंधूंनी बनवला. त्यांच्या वडिलांचा फोटो स्टुडिओ होता.

एमिल रेयनॉड व लिऑन बाउटी या दोन संशोधकांच्या प्रोजेक्टर यंत्रांत सुधारणा करून ल्युमिअर बंधूंनी १३ फेबुवारी १८९५ साली त्यांच्या प्रोजेक्टरचे पेटंट घेतले. त्यांच्याच कारखान्यातील कामगारांचे चित्रण या प्रोजेक्टरवर करून ल्युमिअर बंधूंनी पॅरिसच्या प्रसिद्ध सलोन ग्रँड कॅफेत त्यांची पहिली फिल्म दाखवली.

आज या घटनेला सव्वाशे वर्षे उलटून गेली आहेत. डिजिटल क्रांतीनंतर जुन्या फिल्म प्रोजेक्टरची सद्दी संपली असली तरी अनेक वर्षे फिल्म प्रोजेक्टरने मनोरंजनाच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवले.

आज सॅटेलाईटद्वारे थेट चित्रपटगृहात चित्रपटाचे प्रक्षेपण केले जाते. यामुळे आज फिल्म प्रोजेक्टरची तशी गरज नसली तरी हा एक महत्त्वाचा शोध होता, हे नक्की.

संकलन. – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..