इतर सर्व
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
सुसंवाद साधण्याने
संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ????
या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया. […]
उपलब्ध पाणी हे कोकण विकासाला सहाय्यक ठरू शकेल काय?
आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो. […]
नवं कुटुंब
‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली. […]
अवचित…
भरून आलंच होतं , पडणार हे वाटलंच होतं पण पुण्यांतला मे मधला पाऊस एखाद्या सिग्नल प्रमाणे पडतो फार फार तर मोठ्या चौकातल्या १८० सेकंदाच्या सिग्नल प्रमाणे ; त्यामुळे आडोशाला थांबलेले निघण्याची तयारी करण्यासाठीच थांबलेले असतात. पण आजचा नूर वेगळाच होता. तयारी तब्येतीत कोसळण्याची होती. पावसाची पहिली सर ओसरली की नंतर तो कसा पडतो ह्यावर तो किती […]
कोकण प्रांतातील औद्योगिक वाढ
हवाई वाहतुकीसाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळाबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ, रत्नागिरी येथील थोड्याच कालावधीत सुरू होणारा विमानतळ व सिंधुदुर्ग येथील चिपी-परुळे विमानतळ जोडले जातील. संपूर्ण भारतात ही हवाई वाहतूक आणि सागरमाला उपलब्ध होणार येत्या काही वर्षात! याचाच अर्थ माल वाहतूक त्वरेने भारतभर किंवा जगभर होऊन भारतात तयार होणाऱ्या नाशिवंत मालाला विस्तृत बाजारपेठ उपलब्ध होणार! […]
कोकणातील देवराया
जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे. […]
कोकण कलावंतांची खाण
कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात. […]
कोकणातील गतकालीन कवी आणि लेखक
निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे. […]
छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम
मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही. […]