नवीन लेखन...

आठवणी

सहज फेसबुक चाळत बसलो होतो. अचानक एका मित्राने ‘ठकठक’ पाक्षिका विषयी केलेली पोस्ट दिसली. ‘दिपू दि ग्रेट’, ‘बन्या’, ‘एश – अभी’ ही सदरे पुन्हा पाहून एखादा खूप जुना मित्र भेटल्या सारखा आनंद झाला. आठवणींच्या घोड्यावर दौडत दौडत मन कधी लहानपणी जाऊन पोहोचले कळलेच नाही.

‘चंपक’ आणि ‘ठकठक’ चा प्रत्येक अंक आमच्या घरी यायचा (म्हणजे मी घ्यायला लावायचो). गावी घरचे सामान आणायला आई महिन्यातून दोनदा तरी कणकवलीच्या बाजारात जायची. आपण सकाळी लवकर उठून बसायचं, आईच्या मागे मागे राहायचं, (आपल्याला फसवून गेली तर) बाजारात नाही नेलं तर भोकाड पसरायला आपण मोकळे.

कणकवली ला गेल्यावर खरेदी करण्याचे महत्वाचे (म्हणजे आईसाठी मुख्य आणि आपल्यासाठी नीरस आणि कंटाळवाणे) काम संपल्यावर बस डेपो च्या अगदी समोर असलेल्या रसवंतीगृहामधून मस्तपैकी थंडगार उसाचा रस प्यायचा; आणि मग आपल्या येण्याच्या मुख्य उद्देशाकडे वळायचे. डेपो मध्येच असलेल्या एका पुस्तकांच्या दुकानातून ‘चंपक’ आणि ‘ठकठक’ चे नवीन अंक विकत घ्यायचे. घरी येऊन मस्त अंक वाचून काढायचे, (एकदा नाही हं! कमीत कमी दोनदा) त्यांतील गोष्टींमध्ये हरवून जायचे, कोडी सोडवायची. या अंकांचे होम पेजच मला जास्त आकर्षित करून घेत असत. आपले वाचून झाले की मित्रांना द्यायचे. एकाकडून दुसऱ्याकडे असे करता करता आपल्याकडे परत कधी येईल याची वाट बघायची. (हमखास ते फाटलेल्या अवस्थेतच मिळणार).

आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू होईल. माझे भाचे – पुतणे घरी येतील. तर त्यांच्यासाठी ‘चंपक’ आणि ‘ठकठक’ च्या अंकांचा संच मागवला आहे; पण त्यांची किंमत. (आमच्या वेळी सात ते आठ रुपयांना मिळायचे फक्त).

पण ही आताची सदानकदा मोबाईल मध्ये डोके खुपसून बसणारी (त्यामुळे अर्ध्या जगाचे ज्ञान तर त्यांना इथेच होते) आणि इतर बाबतीत फारशी उत्सुकता नसलेली मंडळी. हे अंक वाचतील की नाही; यात शंकाच आहे. काय माहित? आवडेल ही त्यांना कदाचित!

भावेश र. काटे.

आम्ही साहित्यिक चे लेखक

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..