श्रीनृसिंहसरस्वती महाराज, कारंजे
श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म वऱ्हाड प्रांतातील सुप्रसिद्ध ‘कारंजा’ या गावी झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता असली तरी जन्मशतकाविषयी विद्वानात मतभेद आहेत. काहींनी त्यांचा जन्म शके १३०० च्या सुमारास झाला असे म्हटले आहे, तर कुणी १३१४ हाच शक जन्मशक म्हणून मानतात. […]