देवा तुझ्या दारी आलो
‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले. […]
