हिंदी चित्रपटातील दिपावली गीते…….
चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे. […]
