About सुरेश कुलकर्णी
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

गाण्यांच्या कहाण्या –‘ नैना बरसे रिमझिम रिमझिम ‘

काल ‘ वह कोन थी ‘ मधल —नैना बरसे ,रिमझिम ,रिमझिम हे गाण ऐकल !क्षणात पन्नास वर्ष ,  मागे ओढला गेलो !आणि –“पिया तोरे आवन कि आस –“हि साद कोणीतरी मलाच घालत असल्याचा भास झाला ! लता मंगेशकरचा आवाज मदन मोहनच्या संगीतात अफलातून बहरतो , याचे हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे . […]

शाप !

पुन्हा, पुन्हा हे असच घडतंय ! मी फारसा आकर्षक चेहरा घेऊन नाही जन्माला आलो . यात माझा काय दोष ? मी कुरूप म्हणून काय मला प्रेम करण्याचा अधिकार नाही का ? या तारुण्यात मलाही कोणाचा तरी हात हाती घेऊन सूर्यास्त पाहावा वाटतो ! […]

पोळी का करपली ? वेताळ कथा

पोपट नामक एका तरुणाचे लग्न झाले होते . (येथून पुढे याला पोपट्या म्हणायचे . लग्न झालेल्यांना फारशी किंमत द्यायची नसते . जेष्ठ नागरिक झाल्यावर पोपटराव वगैरे म्हणता येईल . तोवर पोपट्याच ! )साधारण चार सहा महिन्यांनी त्याचा  ‘नव्या लग्नाचे ‘नऊ दिवस संपले . आणि त्याला आपल्या बायकोतले काही दोष जाणवू लागले . […]

तिरसट म्हातारा

नाना झिपरेनी आपला हट्ट सोडला नाही . त्याने पुन्हा झाडावर लटकणाऱ्या प्रेतास खांद्यावर घेतले  व स्मशाना कडे निघाला ! नेहमी प्रमाणे वेताळ प्रेतात प्रवेश करून बोलू लागला . […]

पापी !

भारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती ! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र ‘अक्षय तारुण्य ‘ देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे ! […]

डोके ज्याचे त्याचे

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]

‘रोगा’यण !!

खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे ! […]

कोट

आजकाल लग्ना – कार्यात घालण्याच्या कपड्याचे एक नवच खूळ निघालंय. ‘इथनिक ‘ ड्रेसच ! साधारण संदलच्या उंटाच्या पाठीवर जसा भडक रंगाचा मद्रा
घालतात तसल्या जातिकुळीतल्या कापडाचा लांब बंद गळ्याचा शर्ट (म्हणू का नेहरूशर्ट का कोट माझेच मत पक्के नाही), त्यावर बटबटीत सोनेरी, चंदेरी कशिदाकारी आणि खाली चुडीदार पैजामा. उंच्या पुऱ्या पुरुषांना हा ड्रेस शोभून हि दिसतो. […]

मास्तर, शिक्षक आणि गुरुजी

‘ इतिहासाची पुनरावृत्ती होते ” हे वाक्य वापरण्या इतकाच माझा आणि इतिहासाचा संबंध उरलाय . याला माझ्या पेक्षा माझे शालेय जीवन ,शाळा आणि शिक्षकच ज्यास्त जवाबदार आहेत . ‘इतिहास ‘ तसा रंजक विषय पण आमच्या काळी इतिहासच काय पण समग्र शिक्षणाच्याच सानिध्यात रंजकता येऊ नये अशी ठाम भूमिका सर्वानी घेतली असावी ! युद्ध वर्णना पेक्षा सनावळी आणि तहाची कलमेच ज्यास्त ! या सनावळी आणि तहाच्या कलमानी , आमची या विषयाची आवड ‘कलम ‘ केली ! आम्ही फक्त परीक्षे पुरत्याच आमच्या ‘कलमा ‘ झिजवल्या हे बारीक खरे आहे ! […]

1 2 3 7