विमर्श कथा : ५
खेळण्यातला लाकडी ट्रक घेऊन धावत येणाऱ्या सावलीला बघून बाबा थांबला . डोक्यावरचे मक्याच्या कणसांचे पोते खाली ठेवले आणि घाम पुसत उभा राहिला . सावलीने त्या पोत्यातली तीन कणसे ट्रकमध्ये ठेवली आणि दोरीने बांधलेला ट्रक घेऊन ती निघाली . बाबा तिथेच थांबलेला बघून तिने कमरेवर हात ठेवले आणि ठसक्यात म्हणाली , ” दमतोस ना म्हणून म्हणते एकट्याने काम करू नको , आता मी करते मदत . तू ये हळूहळू. ” […]