नवीन लेखन...

ड्रग्जच्या विळख्यात होस्टेल १

निवांतच्या दरवाजाची बेल वाजली आणि सदूने दार उघडले. दोन प्रौढ गृहस्थ बाहेर उभे होते. सदूने त्यांना विचारले, “अपोंटमेंट आहे कां तुमची ?” सोफ्यावर बसलेले यशवंत हंसले आणि म्हणाले, “सदू पाहुण्यांच स्वागत आपण असं करतो कां ? येऊ दे त्यांना आंत.” दोघेही आंत आले. दोघे लांबून प्रवास करून आलेले वाटत होते. थकलेले दिसत होते. यशवंत त्यांना म्हणाले, […]

खेड्यातले येडे

लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं. […]

पुडिंग (अलक)

विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत. […]

ठकास महाठक

देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता . […]

भाकित

तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती. […]

प्रवास

नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले. […]

रोना जरूरी है

थोरले आबा खूपच सिरियस होते. आज जातील की उद्या अशी अवस्था होती. घरातले काळजीत होते.त्यांचा उजवा हात जितेंद्र खूपच जास्त टेन्शनमध्ये होता. त्याला एका वेगळ्याच काळजीने घेरले होते. तो सतत ठिकठिकाणी फोन लावत होता. कोणाकोणाशी फोनवर बोलत होता. मधूनच आय सी यू मध्ये नजर टाकत होता. आबांचा कारभार दोन दिवसांपेक्षा कमी वेळात आटपू देत अशी देवाशी प्रार्थना करत होता. […]

केशवा

“डॉक्टर मॅडम……डॉक्टर मॅडम….!” शेजारचा सुकेश पळतच माझ्या केबिनमध्ये घुसला. “काय झाल? एवढा का घाबरलास सुकेश ?” मी म्हणाले. तसा घाबरत घुबरत सुकेश माझ्याजवळ आला.माझ्या पुढच्या खुर्चीवर पाय उकड ठेऊन बसला.तो फार घाबरलेला दिसत होता.त्याच्या मनात काहीतरी गुंतागुंत चालली होती.त्याचा चेहरा घाबरून पांढराफटक पडलेला दिसत होता.मला त्याचं हे बावळट रूप पाहुण कसतरीच वाटलं.सुकेश माझ्या बाजुलाच रहायचा.विस पंचवीशीचा […]

पिंपळ

१) कुलकर्ण्यांचा प्रशस्त वाडा. पंधरा वर्षांची कुमुद आजीला शोधत बागेत आली . आजी नेहमीप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली शांत बसली होती. कुमुदला माहीत होतं. आजी औदुंबराच्या झाडाकडेच असणार. आजोबा गेल्याचं दुःख ती पचवू शकत नव्हती. हा औदुंबर आजोबांना प्रिय होता. कुमुदला आजीची अवस्था पहावत नव्हती. तिला पूर्वीसारखी हसीमजाक करणारी हरहुन्नरी आजी हवी होती. कुमुद आजीला म्हणाली, “ आजी […]

व्यवहार

आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्या म्हाद्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात राघवने खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता . […]

1 2 3 4 5 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..