नवीन लेखन...

राधे राधे – कृष्ण कृष्ण

  द्वारकेच्या महालाच्या प्रांगणात वावटळीने रिंगण धरले होते. धुळीचा उभा खांब हेलकावे खात आकाशापर्यंत पोचत होता. त्यात अडकलेली सुकलेली पाने, झुडपे आपली सुटका करून घेऊन इतस्ततः पडत होती. गाई,गुरे झाडांचा आसरा शोधून गप्प उभी होती. महालाच्या बाहेर उभे असलेले प्रतिहारी जवळपासचा खांब पाहून त्याच्या आडोश्याला उभे राहिले होते. आपल्या आसनावर बसून श्रीकृष्ण बाहेरील हे दृष्य पहात […]

नादलुब्धा

कृष्ण हसला .
“अनया , तुला जे कळतं , ते विलक्षण आहे . तुला माहितेय, ही राधा म्हणजे केवळ स्त्रीशक्ती नाही , ते धरतीचं दुसरं रूप आहे . तिची काळजी तुला वाटली . हे ही मला अपेक्षितच होतं . कारण तू म्हणजे नुसता अनय नावाचा पुरुष नाही . तर स्वतःला होणाऱ्या वेदना सहन करत धरतीची काळजी घेणारा महान पुरुष आहेस . आणि ही नदी , हा पाऊस , ही गोधने आणि भवतालचा सगळा निसर्ग, हे सगळं तुझ्यामुळं भविष्यात समृद्ध होणार आहे . हे तुम्हाला दाखवायचं होतं . म्हणून हा घाट घातला . […]

अपूर्ण कथा

कारण कथांतली नायिकाच  शब्दबद्ध होत नव्हती.काही केल्या तिचं रूप मी चित्रित करू शकत नव्हतो. […]

गुरुद्रोणाचार्य : कोचिंग क्लासेस आणि एकलव्य

काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजर्‍याने मला संगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. त्या शाळेच्या बसेस ही एसी आहेत. तरीही त्याला कोचिंग लावावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. – त्या वरुन सुचलेली कथा […]

ब्रेन रॉट – ३ : लोच्या झाला रे

पण बेसिन जवळच्या ज्येष्ठ नागरिक म्हणता येईल अशा माणसाकडे ते पहात होते . गेली सात ते आठ मिनिटे तो माणूस चेहरा धूत होता . नॅपकिन ने कोरडा करत होता . स्वतःभोवती सगळीकडे फिरून चेहरा निरखित होता . पुन्हा चेहरा धूत होता . पुन्हा कोरडा करत होता . पुन्हा… पुन्हा… […]

ब्रेन रॉट – १ : अनावर

ब्रेन रॉट पासून समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथा मालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी . आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी . […]

तेजस्विनी

दोन वर्षांपूर्वी वनिताने आपल्या आईला आजारपणामुळे गमावलं होतं.ती त्यावेळी नुकतीच दहा वर्षांची असेल. एवढी जाणती नसताना देखील तिने वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला जायच्या वेळी कसलाही दंगा किंवा रडून गोंधळ केला नाही. एरवी आईच्या आठवणीत आजीकडे जाऊन ती खूपदा रडायची पण सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागणारी आई आता परत येणार हे सांगितले तेव्हा पासून ती शांत होती. एकुलती एक […]

अकल्पित 

साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता. […]

स्मरणगाथा : १०

निवेदकाने नाव उच्चारताच होणारा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट . कॅमेरे सरसावून पुढं येणारे फोटोग्राफर्स . नामवंत दिग्गजांच्या हस्ते होणारा सत्कार . पुरस्काराचे वितरण . आणि मनोगतासाठी हाती दिलेला माईक . पुरस्कार वितरण समारंभातील हे दृश्य अनोखे , सुखावणारे , प्रसिद्धी देणारे आणि नव्या लेखनासाठी कार्यप्रवण बनवणारे . माझ्या साहित्यिक वाटचालीत असे पुरस्कार समारंभ सातत्याने येत गेले . […]

1 2 3 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..