नवीन लेखन...

तेजस्विनी

दोन वर्षांपूर्वी वनिताने आपल्या आईला आजारपणामुळे गमावलं होतं.ती त्यावेळी नुकतीच दहा वर्षांची असेल.
एवढी जाणती नसताना देखील तिने वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला जायच्या वेळी कसलाही दंगा किंवा रडून गोंधळ केला नाही.

एरवी आईच्या आठवणीत आजीकडे जाऊन ती खूपदा रडायची पण सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागणारी आई
आता परत येणार हे सांगितले तेव्हा पासून ती शांत होती.
एकुलती एक असल्याने तिचे फारच लाड झाले होते .तिच्या वडिलांनी तिला काही कमी पडू दिलं नाही, पण पुढिल आयुष्य कसे जायचे म्हणून आजीने हट्टाने हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला.वनिता तिचे बाबा,आजी,आत्ता, काका
अशी मोजकीच माणसे आवरून लग्नाला निघाली.वनिताचे बाबा शंकरराव वाड्यातल्या सोप्यात आपल्या पत्नीच्या फोटो कडे एकटक पाहत होते.”आपल्या वनिताला मी सांभाळेल तू काळजी करू नकोस’ हेच त्यांची नजर सांगत
होती.तोवरच वाड्या समोर मोटर येऊन उभी राहिली.सारेच घाईने त्यात बसले.वनिता आजीच्या मांडीवर बसली.गाव तसे दोन तासांच्या अंतरावर होते.रस्ता आणि झाडे दोन्ही
पळू लागलीत तसे शंकररावांचे मन भूतकाळात धावू लागले.
लक्ष्मीशी झालेला विवाह त्यानंतरचा नवीन सुखी संसार,तिने
वडीलांच्या आजारपणात आईला दिलेली साथ,पण बरेच दिवस मूलबाळ नाही म्हणून तिला होणारा त्रास आणि बऱ्याच दिवसांनी मग वनिता झाली पण त्यानंतर तिला बाळंतपणापासून अनेक व्याधी जगल्या,आणि दीर्घ आजाराने निधन झाले.वनिताच बालपण आजी, बाबा, थोड्या वेळाकरीता आईबरोबर vhdauoछान मजेत गेल होत पण
अलिकडे ती जरा शांत होती.शंकररावांनी आपल्या छकुली कडे एक नजर वळवली तोवरच निमगाव मध्ये गाडी पोहचली.
समोर मोठा वाडा होता जास्त काही सजावट नव्हती पण बैठक व्यवस्था टापटीप स्वच्छता, त्यामुळे वातावरण
प्रसन्न होते. सगळ्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला.मग ‘सुमती” ला बाहेर आणले. ती थोडी रंगाने सावळी पण नाकी डोळी नीटस होती.लांबसडक काळेभोर केस,बोलके डोळे तिच्या दिसण्यात अजून भर टाकत होते.शंकररावांचीपरिस्थिती सर्वांना माहीत होती .ते विधुर असले तरी जमीन जुमला, नोकर- चाकर , गाडी त्यामुळे घरात कशाला कमी नव्हती. शिवाय पे पाहुण्यांच्या ओळखीने म्हणून हे लग्न लगेच साध्या पद्धतीने मोजक्या लोकांना घेऊन पार पडले.
काही दिवसांनी सुमती नव्या संसाराची नवी स्वप्न पाहू लागली.शकंररावांना देखील लक्ष्मीची आठवण आता तितकीशी येत नव्हती.वनिता मात्र आजीकडे हट्ट करीत असे
“नवीन आई माझ्या आईसारखी कुठे आहे? ती तर फारच वेगळी आहे.’ तेव्हा आजी जवळ घेत तीला शांत करायची.
कोवळ्या बालमनावर नियतीचे ओरखडे उठत होते.सुमतीने शंकररावाची पत्नी,घरची सून म्हणून सारे कर्तव्य केले पण ती वनिताची आई होऊ शकली नाही.सुमतीने वर्षभरातच नवीन बातमी दिली.घरात आता नवीन पाहुणा येणार म्हणून सारे आनंदून गेले.आजी सुमतीची विशेष काळजी घेत होती.
वनिताला मात्र एकटेपणाची जाणीव होत होती.तिचे वर वाढत होते अभ्यासात ती हुशार होती.तिने पाचवी नंतर शिक्षणासाठी शहरात जाण्याचे ठरवले.तीने आजीला व बाबांना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.जीवावरउदार होऊन आजी व बाबांनी तिला परवानगी दिली.
वनिताच्या आवडत्या शिंदे बाई तालुक्यात राहत होत्या त्यांच्या जवळ राहून शिक्षण घ्यायचे ठरले.ती मुळातच हुशार ,लाघवी, मितभाषी तीचा स्वभाव त्यांना फार आवडायचा.विना आईची पोरं परक्या घरी ठेवताना आजीचा
उर दाटून आला.शंकरराव उदास झाले पण शिंदे बाईंनी तिची जबाबदारी घेतली तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे जवळ घेऊन तिची काळजी करत होत्या.सहा महिने झाले वनिता जाऊन आजीला करमत नव्हते.अधूनमधून तिला भेटायला
शंकरराव जात होते इकडे .सुमती बाळंतपणासाठी माहेरी गेली तिला गोंडस, सुंदर असा मुलगा झाला पण दुर्दैवाने त्याला दृष्टीच नव्हती,.” आंधळे बाळ ‘ जन्माला आले.
शंकररावावर मोठा आघात झाला.आजी तर पुरती कोलमडून गेली.अनेक दवाखाने, उपचार, तांत्रिक मांत्रिक,वैद्य सारे काही करून पाहिले पण उपाय कोणताही
झाला नाही. सुमतीचा सगळा दिवस बाळाच्या विचारातच जात असे.
वनिता सहावीत असताना दिवाळी सुट्टीत घरी आली.तिलाही समजले छोटा भाऊ काही पाहू शकत नाही.त्याच्याशी खेळताना तो फक्त आवाजाच्या दिशेने
इकडे तिकडे हालचाल करतो.तीला फारच वाईट वाटले. वनिता मात्र दिवसेंदिवस हुशार होता होती.
बाईंच्या संस्कारात घडत होती.राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा अशा मध्ये भाग घेऊन आपले अस्तित्व टिकवून राहिली.सततच्या केलेल्या मेहनतीने
तिचा सर्वांगिण विकास झाला.ती आता धाडसी झाली होती.
सुट्टी संपली तशी जाताना वनिता बाबांजवळ गेली,त्यांचे दुःख तिला समजत होती.ती बाबांना म्हणाली,” बाबा, तुम्ही
फार काळजी करू नका अशाने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल.’ शंकररावांचे डोळे भरून आले,आज लक्ष्मीची फारच आठवण आली.पोर हुबेहूब आईसारखी कुटुंबांची काळजी
करणारी आणि नाती जपणारी आहे .” त्यांनी मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
दिवसामागून दिवस जात होते असेच एके दिवशी बाईंनी वनिताला बोलवून घेतले, आणि सांगितले “तुला
मागच्या सहा महिन्यांपूर्वी क्रीडा स्पर्धत जिल्हास्तरीय बक्षिस मिळाले आहे ‘. “आता तू पुढे राज्यस्तरीय स्पर्धेत
सहभागी हो ” ह्याचा तुला दहावीच्या परीक्षेत उपयोग होईल.
“तीने मानेनेच होकार दिला”. तिला रोज उठून धावण्याच्या सराव करावा लागायचा पण ती कधीच कंटाळा करत नव्हती.सलग सहा महिने सराव केल्यानंतर तिचे क्रीडा शिक्षक तिला स्पर्धेसाठी घेऊन गेले.वेगवेगळ्या खेळांच्या अनेक स्पर्धा आणि भरपूर खेळाडू तेथे आले होते.आणि
त्याचसोबत अनेक दिव्यांग खेळाडूही पाहिले जे शरीराने विकलांग पण आत्मविश्वासाने भारावलेले, परिस्थितीशी सामना करणारे आपले यश दैदिप्यमान बनवून स्वतःला उभे करणारे जीवनाचे खरे खेळाडू तिने आज पाहिले.त्यामध्ये काही अंध खेळाडू होते ते ब्रेल लिपीत
शिकतात हे तिला समजले,त्यावेळेस अगदी उच्च शहरात
ब्रेल लिपीचे वर्ग घेतले जायचे, विचारल्यानंतर काही गोष्टी
तिला समजत गेल्या आणि तिच्या मनात एका विचाराने ठाम मांडले.तिचीही स्पर्धा उत्तम रीतीने पार पडली तीने राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला.फारच आनंदाने ती परत आली.बाईंनी , घरातील सर्व लोकांनी तिचे
कौतुक केले.शाळेत तिचा मोठा सत्कार झाला.दहावी पास झाल्यावर तिनै राज्य सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईला एक उपक्रम आयोजित केला होता
त्यामध्ये सहभाग घेतला, आणि इथेच तिला तिच्या नव्या विचारांना दिशा द्यायची होती.तिने तेथील शिक्षकामार्फत “ब्रेल लिपी” कुठे शिकतात ते पाहिले, आणि तीने ती लिपीस्वतः शिकण्याची इच्छा व्यक्त केली.
ती धाडसाने “ब्रेल लिपी ” शिकण्यासाठी तेथील अंध मुलांच्या क्लास मध्ये गेली. “लहान भाऊ “निखील’ पाच वर्षांचा झाला आहे पण तो जन्मताच अंध आहे.आणि मी
एका खेडेगावात राहते तो इकडे येऊ शकत नाही.मला तुम्ही हि लिपी शिकवाल का?’ असे तिने धाडसाने तिथल्या सरांना
विचारले. तिच्या धाडसी स्वभावाचे कौतुक वाटले.त्यांनी तिला काही बेसिक गोष्टी शिकण्यास मदत करायला तयारी
दर्शवली.तिने आपल्या राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम त्यांना देऊ केली, पण त्यांनी जुजबी रक्कम घेऊन तिला
महिनाभरात तिला ब्रेल लिपि शिक्षण दिले.
पुढे ती जेव्हा गावाकडे आली तेव्हा स्पर्शज्ञानाची भाषा तिला अवगत झाली होती.तिने बाईंना साऱ्या गोष्टी सांगितल्या, बाईंना तिचा फार अभिमान वाटला.ती आपल्या गावाकडे गेली तेव्हा घरातील सर्वांना तिने ह्यांची माहिती दिली, हळूहळू तीने निखिलला स्पर्शाने भाषेची ओळख ,छोटी छोटी अक्षरे, शिकवायला सुरुवात केली.तो हि हळूहळू तिच्या सांगण्याप्रमाणे शिकत होता.सुमती आता
निखिलची प्रगती पाहून आनंदी होती.शंकयराव पण फारच खुश झाले.घरात आनंदी वातावरण झाले.पुढे जाऊन वनिताने पदवीचे शिक्षण घेतले व स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस खात्यात ती उच्च पदावर कार्यरत झाली.
वनिताला आज गावात सत्कार होणार होता, शिंदे बाई तिला घडवणारे सारून शिक्षक , मित्रमैत्रिणी, नातेवाईक सारे शाळेच्या प्रांगणात जमले.निखिल देखील आनंदीत होऊन बहिणीला मिळालेले यश पेढे वाटून साजरे करत होता.सर्वांनी तिचे मनापासून कौतुक केले.शंकररावांचे ह्रदय
भरून आले.आजी मायेने हात वर करून कौतुक करत होती.साऱ्यांचे मनोगत व्यक्त झाले नंतर सुमती पुढे आली
आज तिच्या मनातली भावनांचा बांध फुटला,ती बोलू लागली* वनिता बाळा,मी तुला कधीच समजू शकले नाही
बालपणी तुझे कधीच कौतुक केले नाही, तुझ्याशी कायम दुजा भाव केला.पण तू माझ्याशी नेहमीच चांगले वागत आलीस आज,माझा मुलगा निखिल ही अंध असूनही तुझ्या मुळे शिकत आहे.” तुझे अनंत उपकार आहेत माझ्या वर
निखिलच्या अंधकारमय जीवनाची खरीखुरी “तेजस्विनी”
वनिता आहे.मी फक्त आई म्हणून त्याला जन्म दिला
तिने त्याला जगण्याची दिशा दिली आहे.’ हे सांगताना सुमतीचे अश्रू ओघळत होते, मायलेकींची हृया क्षणाला खरीखुरी भेट घडली.सर्वाचे मन भरून आले.
घरी आल्यावर शंकरराव लक्ष्मीच्या फोटोकडे पाहत म्हणाले ” लक्ष्मी तू आम्हाला सोडून निघून गेलीस पण
तुझं ,”तेजस्वी रूप ‘ माझ्या घरात आजही लखलखत आहे.

@ प्रतिभा महादेव चौगले

Avatar
About सौ.प्रतिभा महादेव चौगले 4 Articles
माझे साहित्य ज्योतिर्मय व्यासपीठ पुणे,काव्य गंध,दिव्यांग साप्ताहिक अशा ठिकाणी प्रकाशित झाले आहे.मला कविता, लघुकथा, लेख लिहिण्याची आवड आहे.अनेक whatsapp काव्य समूहात समावेश असून, प्रातिनिधिक काव्यसंग्रह व दिवाळी अंकामध्ये साहित्य प्रकाशित केले आहे.तसेच रेडिओ पुणेरी आवाज एफ एम येथे काव्य रचना सादरीकरण होत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..