नवीन लेखन...

बाळगुटी एक वरदान भाग ४- सागरगोटा

सागरगोटा – शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला कुल-लेग्युमिनोसी. ही मोठी आणि काटेरी शिंबावंत (शेंगा येणारी) वेल [महालता] कुंपणावर किंवा क्वचित दुसऱ्या मोठ्या झाडावर चढलेली आढळते. हे एक काटेरी झुडूप किंवा वेल असते. याला बोराच्या आकाराची, टणक आणि गोलसर फळे लागतात. बहुतेक सर्व भागांवर कठीण, सरळ किंवा वक्र व पिवळसर काटे असतात फांदीच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, जुलै-सप्टेंबरात मध्यम आकाराच्या पिवळ्या फुलांच्या मंजऱ्या येतात. शेंगेत तीन ते चार दाणे असतात. शेंग हिरवी असताना हे दाणेसुद्धा हिरव्या रंगाचे असतात. शेंग सुकली की, आतले दाणे तपकिरी काळपट होऊन कडक होतात. या दाणे किंवा बियांनाच ‘सागरगोटे’ म्हणतात फळांचा आकार पूर्णपणे गोलाकार नसतो. बिया राखाडी रंगाच्या आहेत आणि डोळ्यांच्या गोलाकारांसारखे दिसतात, जे संस्कृत नाव कुबेराक्षी स्पष्ट करते, ज्याचा अर्थ संपत्तीचा हिंदू देव कुबेराचे डोळे आहे.

इतर औषधी उपयोग:
त्याचा उल्लेख सर्व आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये केला गेला आहे आणि पारंपारिकपणे गर्भाशयाला शुद्ध करण्यासाठी आणि त्याचे योग्य आकुंचन राखण्यासाठी गर्भाशय उत्तेजक म्हणून वापरला जातो. सागरगोटा शरीरातील वेदना यासारख्या तापाच्या लक्षणांना कमी करण्यास मदत करतो आणि शरीरातील सूज/सूज, सांधे जळजळ आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करतो. आयुर्वेदात सागरगोटाला तिखट,कडू आणि चवीला तुरट म्हणून उल्लेख आहे. सागरगोटा वाढलेला कफ आणि वात दोष कमी करण्यास मदत करतो. सागरगोटा रक्त शुद्धीकरणाला प्रोत्साहन देतो आणि अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतो. बाहेरून – पोट फुगल्यास, सागरगोटाच्या बियांची पेस्ट पाण्यात मिसळून वापरल्याने समस्या कमी होते. हायड्रोसील आणि दुखापतीमुळे वृषणाला सूज आल्यावर, सागरगोटाच्या बियांची जाड पेस्ट लावली जाते. सागरगोटा अर्काच्या संशोधनात्मक वैज्ञानिक अभ्यासात ग्लुकोज शोषण कमी करण्यासाठी आशादायक परिणाम दिसून आले आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मिळालेल्या बोंडुसेला नटाच्या संशोधन अभ्यासात फायटोस्टेरॉल आणि फ्लेव्होनॉइड्सची उपस्थिती दिसून आली आहे जे स्पष्टपणे सूचित करते की सीसाल्पिनिया बोंडुसेलामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट एजंट म्हणून वापरण्याची लक्षणीय क्षमता आहे आणि ते दाहक-विरोधी कृतीला प्रोत्साहन देते.

बोंडुसेला नट
बोंडुसेला नट्स कडू, तुरट, तिखट, थर्मोजेनिक, अ‍ॅनोडी, दाहक-विरोधी, जंतुनाशक, पाचक, पोटशूळ, यकृत शक्तिवर्धक, शुध्दीकरण करणारे, कफनाशक, गर्भनिरोधक, तापरोधक, कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक आहे
बोंडुसेला पावडर बोंडुसेला नट कडू, तुरट, पचनकारक, पोटशूळ, यकृताचे टॉनिक, गर्भनिरोधक, कामोत्तेजक आणि अधूनमधून येणारे ताप आणि दम्यामध्ये देखील उपयुक्त आहे.

सीसाल्पिनिया बोंडुक बियाण्यांपासून तयार केलेले बोंडुसेला पावडर हे टॉनिक, तापदायक आणि अँटीपेरिऑडिक आहे. या पावडरला फिव्हर नट पावडर असेही म्हणतात, ते जुनाट तापात उपयुक्त आहे.

सप्पन लाकडाचा अर्क:
केल्साल्पिनियापासून मिळणारा सप्पनवुड अर्क सप्पन सप्पनवुडमध्ये रक्त गोठण्याची क्षमता आणि शीतलक क्रिया असलेले फ्लेव्होन्स भरपूर असतात, ते गर्भाशयाच्या आकुंचनास मदत करते आणि बॅक्टेरियाविरोधी आहे. बाह्यतः जखमा बरे करण्यास मदत करते.

 

सागरगोटा चे आरोग्यवर्धक फायदे:
• औषधात सागरगोट्याचे बी व पाने वापरली जातात.
• मधुमेह, पोटदुखी, जंत, गर्भाशयाची सूज वगैरे विकारांमध्ये सागरगोट्याची बी वापरली जाते.
• लहान मुलांच्या बाळगुटीत सागरगोटा असतो.
• वायूने पाट फुगते, दुखते त्यावर सागरगोटा भाजून, आतला मगज काढून, त्यात समभाग काळे मीठ टाकून घेण्याचा उपयोग होतो.
• सुजेवर सागरगोटा उगाळून लेप लावल्यास सूज कमी होते.
हिरडीस लावतात. बिया भाजून आणि कुटून पूड अंतर्भूत पोटात आणि बाहेरून लाभस. तसेच कुष्ठरोग, दामा, क्षय आंवर गुणकारी; अग्निमांद पूड गरम ताकातून पुढे हिंग फायटर. तान्ह्या मुलास गजगा गुटीत उगाळून लावतात.
चेहऱ्यातील मुरूम व पुल्लू जातील बियांतील तेल लावतात, तेच तेल संधिवातावरही लावतात व कानातून पू जात असल्यास त्याचे एकदोन थेंब टाकतात. पोटदुखीवर सुंठ, संधव, पादेलोण. भाजलेला हिंग व भाजलेली गजची पूड गरम करून लावतात.

सागरगोटीचे अनेक फायदे डझनावारी
1. जंगलात सहज आणि भरपूर मिळणारी
2.लहान लेकरासाठी गुणकारी
3.पोटाचा विकार लवकर बसविणारी
4.दोन शेतकऱ्यांमधील धुरा सांभाळणारी
5.पीक रक्षणासाठी वन्य पशूंना अडविणारी
6.फळा सोबत सावली आणि ऑक्सिजन देणारी
7.दररोज सेवन केल्यास शरीर निरोगी ठेवणारी
8.घरी जपून ठेवल्यास जास्त दिवस टिकणारी
9.गुरांपासून स्वतःचे रक्षण करणारी
10. दुकानावर स्वस्तात मिळणारी
11. कमी पावसात टिकणारी
12. हलक्या जमिनीत भरभरून येणारी

सागर गोटा कसा घ्यावा?
साधारणपणे पावडर (१-३ ग्रॅम) कोमट पाणी किंवा मधासह किंवा काढा (५०-१०० मिली) म्हणून दिवसातून एकदा किंवा दोनदा घेतला जातो…. सामान्यतः सुरक्षित असले तरी, गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी सावधगिरीने आणि व्यावसायिक मार्गदर्शनाखाली ते वापरावे. सागर गोटासोबत कोणत्या औषधी वनस्पती चांगल्या प्रकारे जोडल्या जातात? सागर गोटा हे सामान्यतः गुळुची, त्रिफळा आणि शतावरी सारख्या औषधी वनस्पतींसोबत एकत्रित केले जाते जेणेकरून डिटॉक्सिफिकेशन, पचनक्रिया सुधारेल,…

 


शास्त्रीय सूत्रीकरण:

लटकारंज चूर्ण: पचन विकारांसाठी वापरले जाते.
कुबेराक्ष तैल: त्वचेच्या आजारांसाठी वापरले जाते….

सागरगोटे व बालपण:
हा मुलींचा खेळ समजला जातो. दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. सागर गोटे अनेकांच्या बालपणीच्या आठवणींची निगडित असा हा प्रकार आहे. हल्ली जशी वने कमी होत आहेत तसे या वनस्पती सुद्धा कमी होत आहेत. स्थानिक भाषेत याला गजका म्हटले जाते. लहान मुले याच्यापासून वेगवेगळे खेळ खेळतात तसेच याने फरशीला घासून गरम करून पोळवले सुद्धा जाते.

कमीत कमी ५ -७ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने सर्व सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. खूप मजेशीर आणि घरात कुठेही बसून खेळण्यासारखा हा खेळ ५०/५५ वर्षापूर्वी घराघरात खेळला जायचा. लहान मोठया मुली सर्व जण खेळतात. यामधे हात बोटे, डोळे, यांना उत्तम व्यायाम होतो झेल पकडायचे कौशल्यही असते.

संदर्भ:
इनामदार, श्री. दे
माधुरी अंतरकर: फेसबुक वरील लेख
मराठी विश्वकोश (2020) शं. आ. परांडेकर
डॉ. विलास जगन्नाथ शिंदे यांचा लेख
गुगल वरील बरेच लेख
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
२६. ११. २०२५

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 105 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on बाळगुटी एक वरदान भाग ४- सागरगोटा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..