नवीन लेखन...

बाळगुटी एक वरदान – भाग ७ – डिकेमाल – निसर्गाची सुवासिक औषधी देणगी

डिकेमाली — निसर्गाची सुवासिक औषधी देणगी

निसर्गातील प्रत्येक झाडामागे एक कथा दडलेली असते — काही औषधी तर काही सुगंधी, काही जंगलाचे रक्षक तर काही माणसाच्या आरोग्याचे साथीदार. अशीच एक आकर्षक आणि उपयोगी वनस्पती म्हणजे डिकेमाली (Gardenia gummifera).

लहानशा आकाराचा पण मोठ्या गुणांचा वृक्ष!

डिकेमाली (Gardenia gummifera) ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून, तिच्या फांद्यांमधून निघणाऱ्या पिवळ्या, सुगंधी डिंकासाठी (गोंदासाठी) ती ओळखली जाते; हा डिंक पचन सुधारणे, जंतनाशक म्हणून आणि लहान मुलांना दात येताना होणाऱ्या त्रासांवर (उदा. ताप, जुलाब) वापरला जातो, जो पोटदुखी, खोकला आणि भूक न लागणे यांसारख्या विकारांवरही गुणकारी आहे.
डिकेमाली — निसर्गाची सुवासिक औषधी देणगी

वनस्पतीचे स्वरूप:
• शास्त्रीय नाव: Gardenia gummifera (गार्डेनिया गमिफेरा).
• कुळ: रुबिएसी (Rubiaceae – कॉफी कुळातील).
• हा लहान पानझडी वृक्ष श्रीलंकेत व भारतात (प. द्वीपकल्प, सातपुडा ते दक्षिण टोकापर्यंत, उ. कारवार, मलबार) आढळतो.
• इतर सामान्य लक्षणे रुबिएसी अथवा कदंब कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
कोरड्या ते अर्ध-ओलसर जंगलात ती सहज वाढते. परागीकरणासाठी फुलांचा सुगंध मधमाशा व फुलपाखरांना आकर्षित करतो, त्यामुळे ही प्रजाती जंगलातील जैवविविधतेत महत्वाची भूमिका निभावते.

वर्णन:
हा एक लहान, सदाहरित वृक्ष असून, साधारण ३ मीटर उंच वाढतो. डिकेमालीचे मोठे वृक्ष असतात व ते डोंगराळ प्रदेशांत असतात. पाने

पेरूच्या पानांसारखी, अंडाकृती आणि चकचकीत असतात. हा वृक्ष पेरूच्या झाडासारखा दिसतो. पाने पेरूच्या पानांसारखी, फळ तोंडल्याएवढे व पेरूसारखे; बीजकोश एकखोलीचा व त्यात पुष्कळ बिया असतात. याचे लाकूड पिवळट पांढरे, कठीण आणि कातीव व कोरीव कामास उपयुक्त असते. फांदीच्या डेखावर गोंद असतो. तो काढून जमा करतात. ह्या गोंदास डिकेमाली असे म्हणतात. डिकेमाली एक जातीचा गोंद आहे व त्याचा रंग हिरवड पिवळा असून त्यास बोक्याच्या मूत्रासारखा वास येतो. हा निर्भेळ असल्यास ओलसर राहून तकाकतो. ह्यात नेहमी बहुतेक भेसळ केलेलली असते. म्हणून सुका दिसतो. निर्भेळ डिकेमालीचे चूर्ण होण्यास कठीण पडते. औषधात निर्भेळ डिकेमाली वापरावी.

 

इतर भाषेतील नावे:
• संस्कृत- नाडीहिंगु: याचा वास हिंगासारखा असतो म्हणून हे नाव.
• गुजराती,हिंदी- डिकामाली;
• कन्नड- डिक्कामल्लि;
• तेलुगू- गेरिबिक्की;
• तामिल- कुंबै

शास्त्रीय नाव- Gardenia gummifera
वैशिष्ट्य – डिकेमाली संकोचविकासप्रतिबंधक, कोष्ठवातप्रशमन,कृमिघ्न, नियतकालिकज्वरनाशक, स्वेदजनन, श्लेष्मनिस्सारक आणि त्वग्दोषहर आहे. डिकेमाली हा पदार्थ गार्डेनिया ल्युसिडा (ब्रिलियंट गार्डेनिया) या दुसऱ्या क्षुपीय (झुडुपासारख्या) जातीपासूनही मिळतो. ही जाती रुक्ष पानझडी जंगलात आढळते. हिला सुवासिक पांढरी फुले येतात. कळ्या व कोवळे प्ररोह (कोंब) यांपासून डिकेमाली स्रवते, तेलात विरघळवून ती कपाळास चोळल्यास डोकेदुखी थांबते.

उपयोग-
• डिकेमाली हिवतापात प्रयोजक औषधाबरोबर देतात. त्याचा उद्देश अंगातील कापरे कमी करणे हा होय. आंतड्याच्या रोगात डिकेमालीची क्रिया उत्तम घडून येते.
• हिने आतड्यातील वायु नाहीसा होतो.पीडा कमी होते. जंत पडतात. गोल जंत पडण्यास हे उत्तम औषध आहे. मुलांना दात येताना ज्वर येऊन जुलाब व उलट्या होतात.अशा स्थितीत डिकेमाली फार गुणावह आहे. एका विशिष्ट झाडापासून मिळणारा पिवळ्या रंगाचा डिंक किंवा गोंद आहे, याचा वास उग्र असतो, म्हणून तो बाळगुटीमध्ये वापरतात. जो प्रामुख्याने लहान मुलांना दात येताना होणारा त्रास कमी करण्यासाठी वापरला जातो, तसेच पाचन सुधारण्यासाठी आणि जंतनाशक म्हणूनही याचा उपयोग होतो. याचा वास उग्र असतो, म्हणून तो बाळगुटीमध्ये वापरतात. खोडावर येणाऱ्या कळ्यांपासून राळेसारखा हिरवा पिवळा डिंक स्रवतो, तो जमा करून वाळवून त्याचे तुकडे किंवा वड्या करतात, बाजारात तोच डिकेमाली नावाने मिळतो. तो कामोत्तेजक, रक्तशुद्धीकारक, सारक, दीपक (भूक वाढविणारा), कृमिनाशक, जंतुनाशक, उत्तेजक व उद्वेष्टननाशक (आचके थांबविणारा) असतो. डिकेमालीला विशिष्ठ वास असून ती उष्ण व बेचव असते. भूक नसणे, आतडी दुखणे, खोकला, अजीर्ण, गर्भाशयोन्माद, मुलांचे दात येताना होणारे अपचनादी विकार, जंतविकार इत्यादींवर डिकेमाली गुणकारी असते. जनावरांच्या जखमेवर माश्या बसू नयेत म्हणून डिकेमालीची पूड लावतात. बियांचे तेल अंकुशकृमींवर पोटात देतात.

• डिकमली नावाची ही औषधी वनस्पती जखमा, त्वचारोग, ताप, पोटदुखी इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. या औषधी वनस्पतीची वेगवेगळी नावे आहेत, जसे की रेझिन, तेलबंपा, बिक्के इ. म्हणून, जेव्हा तुम्हाला वेगळे नाव दिसते तेव्हा गोंधळून जाऊ नका कारण ती एकच वनस्पती आहे. डिकमली पावडर कधी सुरू करावी?

• डिकमली पावडर लहान मुलांच्या नाजूक हिरड्यांसाठी बनवली जाते, जी लहानपणापासूनच तोंडाच्या आरोग्याला आधार देते. त्याची हर्बल रचना एक सुखदायक परिणाम देते आणि 0 ते 2 वर्षांच्या बाळांसाठी योग्य आहे. वापरण्यास सोपी आहे: पावडर कोमट पाण्यात मिसळा आणि थेट हिरड्यांना लावा.

त्याचे वैद्यकीय उपयोग काय आहेत?
• पारंपारिक औषधांमध्ये अनेक दशकांपासून वापरल्या जाणाऱ्या गार्डेनिया गुमीफेराचे औषधी गुणधर्म लक्षणीय आहेत.
• दातदुखीच्या समस्या दूर करा
• गार्डेनिया गुमीफेरा हा प्रौढ आणि मुले दोघांमध्येही दातदुखी दूर करण्यासाठी वापरला जातो. डिकमल्लीमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने, जखमा बऱ्या करण्यासाठी वर्षानुवर्षे याचा वापर केला जात आहे. बाजारात, जखम लवकर बरी होण्यासाठी तुम्हाला एक पेस्ट मिळेल.

बहुउद्देशीय औषध?
• डिकमल्लीमध्ये लक्षणीय अँटीऑक्सिडंट क्रिया असते. अपचन, भूक, जलोदर, पोट फुगणे, आतड्यांसंबंधी परजीवी इत्यादी वैद्यकीय कारणांसाठी या घटकाचा वापर केला जातो. बरेच लोक श्वास लागणे, जुनाट खोकला, हिचकी, मलेरिया, सर्दी, ताप, कडकपणा, त्वचा रोग इत्यादींवर उपचार करण्यासाठी या उत्पादनाचा वापर करतात. श्वास लागणे बरे करण्यासाठी विरघळलेले रेझिन कोमट पाण्यात मिसळले जाते.

• ही औषधी वनस्पती बहुतेक आयुर्वेदिक दुकानांमध्ये पावडर स्वरूपात उपलब्ध असते ज्याला सामान्यतः डिकमली पावडर म्हणतात. ती गडद हिरव्या रंगाची असते आणि तिला वेगळा सुगंध असतो. दातदुखीसाठी आजीची ही रेसिपी तुम्हाला आठवते का?

• डिकेमाली हिवतापांत प्रयोजक औषधाबरोबर देतात .
त्याचा उद्देश अंगांतील कांपरें कमी करणे हा होय . आंतड्यांच्या रोगांत डिकेमालीची क्रिया उत्तम घडून येते. हिनें आंतड्यांतील वायु नाहींसा होतो.पीडा कमी होते व जंत पडतात. गोल जंत पडण्यास हें उत्तम औषध आहे.

• कुपचन आणि पोटफुगी यांत डिकेमाली कडू व सुगंधि पदार्थाबरोबर देतात. मुलांना दांत येतांना ज्वर येऊन जुलाब व उलट्या होतात अशा स्थितींत डिकेमाली फार गुणावह होते . डब्यावर डिकेमाली व अलोवा यांचा लेप करतात व डिकेमाली पोटांत देतात . ह्यानें पोटफुगी ताबडतोब उतरते . जीर्ण त्वचा रोगात डिकेमाली देतात. जखमेच्या व्रणावर ही पाण्यांत उगाळून लाविली असतां माशी बसत नाहीं व व्रण जलदी भरून येतो. नारूं रोगात ५ गुंजा प्रमाणांत देतात.

• गुण- लघु , रुक्ष , तीक्ष्ण , कटू , तिक्त , उष्ण गुणांची डिकेमाली कफवातशामक आहे .
बाह्योपयोगाने ती जंतुघ्न , व्रणरोपण व वेदनास्थापन कार्य करते .

• दंत शूलांतही उपयोगी पडते . मुलांचे दात येताना होणारी शिवशिव डिकेमाली हिरडयांना मधातून घासण्याने कमी होते.

• अरुचि, अग्निमांद्य , अजीर्ण, आध्मान, गुल्म, अर्श कृमी इत्यादी अंतर्मार्गातील विकृतींवर डिकेमाली हे एक श्रेष्ठ औषध आहे. कृमींवर डिकेमाली उपयोगी पडते .

• कफवातात्मक हृदयविकृती व प्लीहावृध्दी यावर डिकेमाली शोधनात्मक व वायुचे अनुलोमक कार्य करते. अर्ध्या लिंबावर डिकेमाली पेरुन ते खदखदुन चोखण्यास द्यावे. जीर्णकास, श्वास तसेच चर्मरोगावरही उपयोगी पडते . शीतपूर्वक ज्वरातील ज्वरवेग शैत्य व कंप कमी होण्यास हिचा उपयोग होतो.

• डिकेमाली मेदोपाचक असल्याने मेदोगत अनेक विकारावर ती उपयोगी पडते.

• डिकेमाली फळें लोणच्यांत घालतात.

इतर उपयोग:
(१) पोटदुखीवर – एक निंबू चिरून त्याच्या एका फोडीवर डिकेमाली भरून दुसरे फांकीचा रस वर पिळून डिकेमाली भरलेली फाक निखाऱ्यांवर ठेवून खतखतुं द्यावी. मग काढून चोखावी ( (२) जंतावर – डिकेमालीचें चूर्ण साखरेशीं द्यावें .
(३) मोडशी, शीण व ज्वर यांवर – डिकेमालीचें चूर्ण साखरेशीं द्यावें.
(४) जनावरांच्या क्षतांत कृमी झाल्यास – क्षतांत डिकेमाली भरावी.
(५) डब्यावर – डिकेमाली व काळा बोळ हीं पाजावीं.
(६) मुलाच्या उसणीवर डिकेमाली
(७)तेलात विरघळवून ती कपाळास चोळल्यास डोकेदुखी थांबते.
(८)रेवाचिनी व काळा कोळ ऊन पाण्यांत वांटून पोटावर बेंबीची जागा खेरीज करून लेप द्यावा पोटदुखी कमी होते.
डिकेमालीची सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे तिची गम (राळ). पारंपरिक आयुर्वेदात आणि लोकऔषधांमध्ये या राळेचा उपयोग अनेक विकारांवर केला जातो.
पूर्वी ग्रामीण भागात लोक हिंग मिळत नसल्यास डिकेमाली राळ वापरत असत — त्यामुळे तिला “नदीहिंगु” असे सुंदर नाव मिळाले.

आज या वृक्षाची ओळख आणि औषधी महत्त्व सामान्य लोकांपर्यंत कमी प्रमाणात पोहोचली आहे. त्यामुळे याचे संवर्धन आणि पुनर्लावणी आवश्यक आहे.
डिकेमालीसारख्या वृक्षांचे अस्तित्व केवळ औषधी उपयोगापुरते मर्यादित नाही. हे वृक्ष मातीची ओल राखतात, प्राणवायू देतात आणि जैवविविधतेचे संतुलन राखतात.
जर आपण आपल्या परिसरात अशा वनस्पतींची लागवड केली, तर निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही या सुगंधी वारशाचा अनुभव घेता येईल.

टिप-
माहिती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत. आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१२. १२. २०२५

संदर्भ :
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा या लेखात संदर्भ म्हणून केला आहे.
डॉ. लिलाधर उगले यांचा लेख
डॉ. हर्डीकर के एस यांचा लेख
द्रव्यगुणविज्ञान.
वनौषधी गुणादर्श .
औषधी संग्रह.
मराठी विश्वकोश
मराठी विकिपीडिया
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 105 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on बाळगुटी एक वरदान – भाग ७ – डिकेमाल – निसर्गाची सुवासिक औषधी देणगी

  1. खूपच छान लेख आहे व उत्तम रीत्या सर्व माहिती सांगितली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..