बाळगुटी एक वरदान: भाग ९- वावडिंग
वावडिंग एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. वावडिंगामुळे पचनक्रिया सुधारते, रक्तातील विषारी द्रव्ये कमी होतात आणि पोटातील कृमींचा नाश होतो. दुसऱ्या झाडाभोवत विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.
वावडिंग (Embelia ribes) जी मिर्सिनेसी कुलातील असून तिला ‘खोटी काळी मिरी’ (False black pepper) असेही म्हणतात. ही वनस्पती
पचन सुधारणे, जंतनाशक म्हणून, रक्तशुद्धीसाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी (डिटॉक्स) आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरली जाते आणि महाराष्ट्रातील डोंगराळ भागात आढळते.
• शास्त्रीय नाव: एंबेलिया राइब्ज (Embelia ribes).
• कुळ: मिर्सिनेसी (Myrsinaceae).
• स्थान: वावडिंग भारत (विशेषतः महाराष्ट्र, कोकण, हिमालय) आणि श्रीलंका, मलेशिया, चीनमध्ये आढळते.
• स्वरूप: ही वेल दुसऱ्या झाडांना विळखे घालून वाढते. तिचे खोड सडपातळ आणि खरखरीत असून तिला गाठी असतात.
इतर प्रादेशिक नावे:
• इंग्रजी : एम्बेलिया, हिंदी : वयविदंगा, भाभिरंगा, बबेरंग, संस्कृत : जंतुघ्न, कृमिघना, वेल्ला, क्रिमिहार, क्रिमिरपू, उर्दू : बाओबरंग, बबरंग,
• पंजाबी : बब्रुंग, वावरिंग, आसामी : विदंग, बंगाली : विदंग, गुडवण्णा, वैदंग, वावदंग : वायुविलंगा, वायुविदंगा, काश्मिरी : बाबडिंग, मल्याळम : विझलारी, विझालारी,
• मराठी : वावडिंग, वावडिंग, खोटी काळी मिरी, ओरिया : बिदंगा, विदंगा, तमिळ : वायुविलंगम, वायुविदंगम, तेलगू : वायुविदंगलु.
वर्णन:
• ही एक इंडो-मलेशियन प्रजाती आहे, जी भारत, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण चीनमधून आढळते. ही संपूर्ण भारतात मध्य हिमालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आढळते. समुद्र सपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंत सापडते. विदंगा हे एक मोठे बारमाही सदाहरित झुडूप आहे, वावडिंगाची वेल आवृतबीजी वनस्पती असून दुसऱ्या वनस्पतीला विळखे घालून वाढते. खोड सडपातळ, खरबरीत असून त्यावर लालसर ग्रंथी असतात. फांद्या लांब, बारीक व लवचिक असून कांडे लांब असते. पाने साधी, एकाआड एक, दीर्घवर्तुळाकार, दोन्ही टोकांना टोकदार, चकचकीत आणि चामड्यासारखी असतात. फुलांचे तुरे असतात. फुले लहान, पांढरी असून त्यांचे देठ ७–८ सेंमी. लांब असतात. फळे काळी मिरीपेक्षा लहान,लालसर तांबडी ते काळ्या रंगाची असून त्यावर उभे पट्टे असतात. ती गोलाकार, गुळगुळीत, मांसल असून पिकल्यावर काळी होतात. फळांमध्ये भुरकट लाल रंगाचा मगज असतो. वावडिंग मिऱ्यासारखी किंवा कबाबचिनीसारखी दिसतात. फळात बी एकच असते.
फळास देठासकट पांच पट्ट्यांचे एक पुष्पपात्र चिकटलेले असते व टोकाकडे लहान काटा असतो. रंग तांबूस उदी असून फळावर उभे पट्टे असतात. फळ जुने झाले की काळे पडते. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.
फुले लहान, द्विलिंगी, पंचभागी (प्रत्येक मंडलात पाच दले असलेली), केसाळ, अनेक, हिरवट पिवळी व सुगंधी असून फेब्रुवारीत विरळ शाखायुक्त परिमंजरीवर (पुष्पबंध) येतात. मृदुफळे ३ – ४ मिमी. व्यासाची, गोलसर, गुळगुळीत, काळी व रसाळ असतात. ती मिरीसारखी दिसतात. त्यांत एकच बी असते. शुष्क फळ कृमिघ्न (कृमिनाशक), स्तंभक (आकुंचन करणारे), पौष्टिक व आरोग्य प्राप्त करून देणारे असते.
वावडिंगचा औषधी उपयोग:
• फळांचा काढा ज्वरात आणि छातीच्या व त्वचेच्या रोगांवर देतात. मुळांचा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेतल्यास इन्फ्ल्यूएंझाचा विकार जातो, असे नमूद आहे. फळांपासून केलेले मलम नायटा व त्यासारख्या त्वचारोगांवर लावतात. लहान मुलांना जंत झाले असता फळांचे चूर्ण मधातून देतात व उदरवायूवर फळे दुधात उकळून पाजतात. फळे मिरीत भेसळ करण्यासही वापरतात.
• रक्तशुद्धीपासून पोट साफ करण्यासाठीही या औषधाचा वापर चांगला मानला जातो. ही पारंपरिक औषधी असून आजीच्या बटव्यात वावडिंगाला मानाचं स्थान असायचं.
• आधुनिक औषध-गोळ्यांबरोबच लोक आता पारंपरिक वनौषधीचाही आरोग्यासाठी वापर करू लागली आहेत. यामुळे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारू शकते, असा दावा केला जातो.
वावडिंगाचे फायदे:
• वावडिंगाच्या वापराने रक्तातील दूषित द्रव्य साफ होतात आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्ये त्वरित आराम देण्याचे काम ही औषधी करते. गंभीर समस्यांमध्येही याचा तात्काळ फायदा होतो. तसेच पोटातील कृमी दूर करून पोट निरोगी करण्याचे काम करते. पण त्याचा वापर योग्य आणि संतुलित प्रमाणात करावा.
• आयुर्वेदिक फिजिशियन डॉ. सरफराज अहमद म्हणाले की, वावडिंग (विदांग) हे एक अद्भुत औषध आहे जे बाजारात सहज उपलब्ध आहे. याच्या वापराने शरीरावर खूप परिणामकारक फायदे होतात. हे शरीरात होणारे अनेक आजार रोखण्याचे आणि बरे करण्याचे काम करते. वावडिंग हे रक्त स्वच्छ करते आणि पोटातील अपचन बरे करण्याचे तसेच पोटातील कीड दूर करण्याचे आणि पोट निरोगी बनविण्याचे काम करते. हे दातांसाठीही खूप फायदेशीर आहे.
वावडिंग व बाळगुटी:
• वावडिंग हे आजीबाईच्या बटव्यातील महत्वाचे औषध आहे. खासकरून नवजात बालकाला पाणी किंवा वरचे दूध पाजण्यास सुरवात केली की त्यात चार पाच दाणे वावडिंग टाकले तर दूध पचण्यास उपयोग होतो तसेच लहान बाळाचे जंतांपासून संरक्षण होते. आपण नेहमी पाहतो लहान मुलांच्या पांढरट चट्टे दिसतात, मुलं झोपेत दात चावतात, झोपल्यावर तोंडातून लाळेचा ओघळ येतो.खूप स्वप्न पडतात ही सगळी पोटात जंत झाल्याची लक्षण आहेत. कधी कधी अंगाला खाज येऊन पित्त उठते. अंगावर निळसर लाल मोठ्या पसरट गांध्या उठतात ही सुध्दा पोटात मोठ्याप्रमाणात जंत झाल्याची लक्षणे आहेत. मळमळणे,उलटी आल्यासारखे वाटते,भुक न लागणे ही पण जंताचीच लक्षणे आहेत अशी लक्षणे लहान थोर सर्वांना दिसून येतात. बारीक कृमी असतील तर गुदद्वाराच्या तोंडावर सतत खाज सुटते. अशाप्रकारच्या सर्व त्रासावर वावडिंग हे रामबाण औषध आहे. वावडिंग चूर्ण मधात मिसळून घेतल्याने फरक पडतो.
• वावडिंग हे एका झाडाचे दाणे असतात. ह्यांचा उपयोग मुख्यतः जंतांच्या दुखण्यावर केला जातो. हा जरी प्रधान गुण असला, तरी वाताचा नाश करणे, पचनाला मदत करणे, रक्ताची शुद्धी करणे, अपचनाची दुखणी, पोटात दुखणे, अग्निमांद्य इत्यादी त्रासांवर ह्याचा उपयोग होतो.हे उत्तम कृमिनाशक व मुलाच्या एकंदर विकासाला मदत करणारे असते. मूल वर्षाचे होईपर्यंत दर दोन महिन्याला वावडिंगाचा एक दाणा वाढवत नेल्यास त्याला सहसा कुठलाच त्रास होणार नाही, असे सांगितले जाते. वावडिंग पचनाला मदत करते, रक्त शुद्ध करते, जंतांवर उपयोगी ठरते आणि मुलांसाठी ‘रसायना’ प्रमाणे गुणकारी सिद्ध होते.
• लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडतात व ते दूध देतात.
• लहानपणी, आई आणि आजीने मुलांना विदांगच्या काही बिया घालून उकळलेले दूध देऊन दैनंदिन दिनचर्या सुरू केली. असे दूध पचण्यास सोपे असते आणि त्यामुळे जंत होत नाहीत. गॅस तयार होत नाही, पोटशूळ होत नाही किंवा जंत दुखत नाहीत, त्यामुळे ते एक आदर्श देशी जंतनाशक आहे. वावडींग पाणी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी सर्वोत्तम जंतनाशकांपैकी एक आहे.
• मुलांमध्ये खोकला आणि सर्दी झाल्यास, वावडिंग पावडर मधासह दिली जाऊ शकते.
आपण याचे गुणधर्म उपयोग बघू या:
• वावडिंग घेणाऱ्याला छान भूक लागते. अन्न पचते, शौचास साफ होते, त्वचेचा रंग सुधारतो शरीर तेजःपुंज दिसते.
• आकड, फेफरे, अर्धांगवायू, आदि मेंदू व मज्जतंतूच्या रोगात वावडिंग लसणाबरोबर दूधात उकळवून ते मग प्यावे याने हे त्रास बंद होतात.
• सर्व प्रकारच्या त्वचारोगात वावडिंगाचे चूर्ण मधात मिसळून घ्यावे. व वरून लेप द्यावा कधी याचि धूरी देखील देतात..
• बहुतेक प्रकारचे कुष्ठरोग हे अन्नपचन न झाल्यामूळे होतात पण वावडिंग घेतल्याने पचनक्रिया सुधारल्याने कुष्ठ रोग बरे होण्यास मदत करते.
• पोटात जंत झाल्यास याचा काढा घ्यावा. जंत मरून बाहेर पडतात.
• वावडिंगाचि पूड कापसाच्या बोळ्यात घालून दाढेत धरावि याने दात व दाढा दुखायच्या थांबतात.
• काविळ रोगात वावडिंग व पिपप्लि हे समभाग घेउन उगाळून याचे नस्य केल्यास फायदा होतो..
• हे एक चांगले रसायन आहे. वावडिंग व सुंठचूर्ण एकत्रित करून रोज सकाळी १-२ ग्रँम घेतल्याने व्रुद्धावस्था लवकर येत नाही..
• एकूणच हे एक उत्तम क्रुमिघ्न असल्याने घरात जरूर असावे. विशेषतः पावसाळ्यात पाण्यात टाकून, उकळवून पिल्यास साथिचे रोग दूर राहतात. काँलरा, हैजा, हगवण, जुलाब हे होत नाही..
• पचनसंस्था: अपचन, उलट्या, पोटशूळ, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांमध्ये विदंग किंवा वावडिंग कोमट पाण्यासोबत वापरले जाते. कोणत्याही प्रकारच्या जंतांमध्ये, १० ग्रॅम वावडिंग पावडर रिकाम्या पोटी दिली जाते आणि नंतर शमन करणारे औषध दिले जाते. हे पचनसंस्थेला मदत करते.
• श्वसनसंस्था: वावडिंग हे जंतनाशक असल्याने, ते जंतांमुळे (क्रुमी) विष तयार होऊ देत नाही आणि फुफ्फुसांमध्ये हवेचा थर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. नासिकाशोथ आणि मायग्रेनमध्ये, त्याची बारीक पावडर नस्य म्हणून वापरली जाते.
• मूत्रसंस्था: वावडिंग मूत्रसंस्थेवर कार्य करते, लघवीचे प्रमाण वाढवते, लघवीतील आम्ल उत्सर्जन वाढवते, डायसुरियामध्ये उपयुक्त आहे. कृपया लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही वावडिंगचे सेवन करता तेव्हा त्यामुळे लघवी लाल होते जी सामान्य आहे.
काही घरगुती उपाय:
• अपचन आणि तापासाठी, मधाच्या गोळ्यासह वावडींग तोंडात ठेवावे.
• मुलांमध्ये खोकला आणि सर्दी झाल्यास, वावडिंग पावडर मधासह दिली जाऊ शकते.
• पिप्पलीसह विदांग हे कावीळमध्ये नस्य आणि अंजना म्हणून वापरले जाते.
• दंत काळजी आणि दातदुखीमध्ये, वावडिंग पावडर किंवा बियांचा काढा गुळण्या करण्यासाठी वापरला जातो.
• त्वचेच्या आजारांसाठी वावडिंगची पेस्ट बाह्यरित्या लावली जाते.
• क्रॉनिक राइनाइटिस आणि डोक्याच्या इतर आजारांमध्ये नाकाने वावडिंगची बारीक पावडर वापरता येते.
• वावडिंगाचा फळे आणि बिया हे भाग वापरले जातात.
• विडंगारिष्ट आणि विडंगासव ही औषधेही बाजारात उपलब्ध आहेत.
पाककला: कोकणात वावडिंगाची भजी करतात.
आयुर्वेदिक गुणधर्म:
• रस : कटू, टिक, गुण : लघू, रुक्सा, टिक्सना, विपाक : कटू, विर्य : उस्न , कर्म : अनुलोमन, दीपन, कृमिनासन, वातकपाहा.
रासायनिक घटक:
• त्यात बेंझोक्विनोन, ३ (२एच)-बेंझोफुरन, अल्कलॉइड (क्रिस्टेम्बाइन), एम्बेलिन, एम्बेलिक अॅसिड, एम्बेलिनॉल, एम्बेलिऑल, होमोएम्बेलिन, व्हिलांगिन, क्वार्विटॉल, क्वेर्सिटॉल, टॅनिन आणि आवश्यक तेल असते.
वावडिंग व बाजारभाव:
• सध्याचा सुक्या वावडींगाचा रूपये ७०० ते ८०० रुपये प्रती किलो दर आहे. ओसाड पडलेली माळराने या वनस्पतीची लागवड करून आपण हिरवीगार करू शकतो. फक्त लागवड केल्या नंतर कुंपण करायला हवे. कारण चरायला जाणारी गुरे या झुडपांची नासाडी करू शकतात. एका वावडींगाच्या झुडूपापासून साधारणपणे एक किलोच्या आसपास सुकी वावडींगे मिळतात. आता पुढचे अर्थशास्त्र तुम्हीच करू शकता. वावडींगाची लागवड काजू किंवा आंब्याच्या बागेत करून आंतरपीक म्हणुनही घेऊ शकता. आपल्या कोकणाच्या आर्थिक संपन्नेतेमध्ये या पीकाची भर घालू शकतो.
संदर्भ:
• भरत वैद्य, निघंटू – आयुर्वेदिक वनौषधी, आयुर्वेद साधना, २००८-२०२०
• सर जेम्स वॅट – आयुर्वेदिक वनस्पतिशास्त्र शब्दकोश -१८८९.
• प्रभुराम आयुर्वेदिक विद्यालय (कॉलेज), मुंबई, भारत- १८९६
• सखाराम अर्जुन- ग्रँट मेडिकल कॉलेज १९०५
• चरक संहिता
• जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
• प्रा. डॉ. सुचेता दळवी
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
१२.०१.२०२६
आयुर्वेदिक औषधी वनस्पती, इंडो-मलेशियन प्रजाती, एंबेलिया राइब्ज (Embelia ribes), खोटी काळी मिरी, बाळगुटी, मिर्सिनेसी, वावडिंग, वावडिंगाचे फायदे, वैदंग


खूप छान लेख आहे! विषयाची सखोल माहिती, स्पष्ट विचारमांडणी आणि वाचकांना उपयोगी पडेल असा दृष्टिकोन यात दिसतो.