नवीन लेखन...

बाळगुटी एक वरदान: भाग ९- वावडिंग

बाळगुटी एक वरदान: भाग ९- वावडिंग वावडिंग एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. जी अनेक आजारांवर गुणकारी आहे. वावडिंगामुळे पचनक्रिया सुधारते, रक्तातील विषारी द्रव्ये कमी होतात आणि पोटातील कृमींचा नाश होतो. दुसऱ्या झाडाभोवत विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते. वावडिंग (Embelia ribes) जी मिर्सिनेसी कुलातील असून तिला ‘खोटी काळी मिरी’ (False black […]

भारतीय संस्कृतिचे संवर्धक : विश्वकर्मा शिल्पकार – प्रस्तावना

ऋग्वेदात एकीकडे वस्तू निर्माण करणारा तक्षा, कर्मार वगैरे कारागीर आहेत, तर दुसरीकडे विश्व निर्माण करणारा विश्वकर्मा आहे. (ऋ. १०.८१-८२) तत्कालीन विद्वान ऋषींना विश्वाचे शिल्प घडविणाऱ्या शिल्पकाराला विश्वकर्मा म्हणण्याची कल्पना समाजातील शिल्पकाराला पाहूनच सुचली आणि परवर्ती (वेदोत्तर) साहित्यानी प्रासाद, लेणी, मंदिर, मूर्ती, चित्र, अलंकार अशा कला कौशल्याच्या अनेक वस्तू, वास्तू निर्माण करणाऱ्या शिल्पकराला विश्वकर्मा हे नामाभिधान दिले आणि ते रुढही झाले. म्हणून विश्वकर्माच्या नावाने कला-शिल्पकारागिरांचा समाज नाव लौकिकास आला. विश्वकर्मा समाज म्हणजे कला-कारागिरांचा समाज हे समीकरण वेदोत्तर प्राचीन ग्रंथानीच रुढ केले. […]

गदिमांच्या पंचवटीतून

या पुस्तकात १ मुकी अंगडी बालपणाची… २ रंगीत वसने तारुण्याची… ३ लेणे वार्धक्याचे ह्या शीर्षकानुसार मायाताई यांनी तीन भागात माहिती दिली आहे. पहिल्या भागात त्यांनी लग्नापूर्वीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यात त्यांनी कर्जत जि. रायगड येथील आरेकर वाडा व तेथील आई, वडील, आजी आजोबा, काका, काकू व लहान भावंडे यांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. […]

श्रीलंकेला का जावे

भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर, हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात तरंगणारा एक सुंदर बेटराष्ट्र म्हणजे श्रीलंका. प्राचीन काळी याला लंका, सीलोन आणि सिंहलद्वीप अशा नावांनी ओळखले जात असे. आज “मोत्याचे बेट” म्हणूनही हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. श्रीलंका आकाराने लहान असली तरी तिचा इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचे वैभव अपार आहे. रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच भूमीशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी ही केवळ एक परदेशयात्रा नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनुभव आहे. […]

विश्वकर्मा शिल्पकार: संकल्पना आणि व्याप्ती

समाज हा एका विशिष्ट वंशाच्या, भाषेच्या किंवा व्यवसायाच्या लोकांचा समूह असतो. समाजाचा जसजसा व्याप वाढत जातो तसतसे त्यातील गुण वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवू लागतात आणि त्या गुण वैशिष्ट्यांना घेऊन आपला वेगळा समूह निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरु होते. यातून मग एक नवा समाज नावारुपास येतो. पुढे हे नावच त्या नवनिर्मित समाजाची मर्यादा आखून देते. […]

बाळगुटी एक वरदान- भाग ८ : नागरमोथा वनस्पती

नागरमोथा वनस्पती ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे, जी बाळगुटीमध्ये वापरली जाते; आणी तिच्या थंडगुणधर्मासाठी आणि पचनास मदत, कृमीनाशक, लघवी साफ करण्यास मदत, आणी वजननियंत्रणात उपयोगी असणाऱ्या फायद्यांसाठी ओळखली जाते. ही पित्त आणि कफ कमी करते, तसेच अतिसार व कृमींवर प्रभावी आहे. […]

जानेवारीचे जवाहीर

‘जानेवारी मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘कल्पक, दृढनिश्चयी व नेतृत्वगुणयुक्त’ मानल्या जातात. चालू ‘जानेवारी महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

जे भाग्य मजला लाभले

माझ्या व्यावसायिक निवदेनाच्या कारकीर्दीची सुरुवातच मूळात ग.दि. माडगूळकरांसारख्या श्रेष्ठ कविवर्य गीतकाराच्या शब्दांच्या साथीनं झाली. कार्यक्रम होता ‘चैत्रबन’. श्रीधर माडगूळकरच्या दोस्तीमुळे, अण्णांच्या ‘पंचवटीत’ त्यांना थेट भेटण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच भेटीत अण्णांनी मला एक प्रवासवर्णनपर पुस्तक भेट दिलं. खुद्द अण्णांशी बोलून, त्यांचे लेखनिक बाळ बापट, तसेच सुधीर मोघे, बाबूजी, श्रीधर यांच्याशी गप्पा करता करता, गदिमांच्या गाण्यांमागच्या कहाण्या कळल्या आणि त्या कहाण्या संपादीत करत मी गदिमांच्या चित्रपटगीतांचं निवेदन केलं आणि टाळी मिळवली. पु. ल. देशपांड्यांच्या वाणी आणि लेखणीतून खरेखुरे कविवर्य ग. दि. माडगूळकर सोप्या शब्दात मनात रुजत गेले. […]

मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..