नवीन लेखन...

आयुष्य चार दिवसांचं… पण जगणं आपल्या हातात!

आपण आयुष्यभर काही ना काही मिळवण्याच्या धावपळीत असतो. मोठं घर, मोठी गाडी, भरपूर पैसा, प्रतिष्ठा आणि इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा… पण या सगळ्याच्या मागे धावताना एक गोष्ट मात्र नकळत हरवून जाते मनःशांती. […]

द्रव स्वरूपातील एकमेव धातू : पारद (पारा)

आपल्याकडे एखादी व्यक्ती रागावली तर तिचा पारा खूप चढला आहे असे म्हणतात. खरे म्हणजे पारा हा एकमेव धातू आहे जो द्रवरूपात आढळतो.
पारा (Mercury, रासायनिक संज्ञा: Hg, अणुक्रमांक: ८०) हे एक नैसर्गिक मूलद्रव्य आहे. सामान्य किंवा खोलीच्या तापमानाला द्रव अवस्थेत असणारा हा एकमेव धातू आहे. हा चंदेरी व चमकदार रंगाचा, पाण्यापेक्षा १३.६ पट जड असणारा अत्यंत विषारी धातू आहे. याविषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे: पाऱ्याचे लॅटिन नाव “हाईड्राजिरअम” असे आहे. (Hg) […]

गुरुजी सांगा कोणाचे?

प्रश्न पडण्याचे कारण की शिक्षकांना अशैक्षणिक कामे इतकी आहेत की गुरुजी आयोगाचे, कां शाळेचे, कां विद्यार्थ्यांचे, कां सरकारचें, का संस्था चालकांचे ? शिक्षकांची भूमिका करणं व शिक्षकांची भूमिका जगणं वेगळं यात फारकत झाल्यामुळें गुरुजी कोणाचे? हा संभ्रम आहे. क्लासमध्ये काही मुलांना जवळ करण्याचा नादात गेस पेपर सांगणारे गुरुजी लोकप्रिय तर त्यामुळे काही असंख्य मुलांच्या गुणवत्ते वर परिणाम झाल्यामुळे काही गुरुजी नकोसे झाले आहेत. मुलींशी गैरवर्तन करणारे अनेक गुरुजी मुलींना आवडत नाहीत. […]

धनसाकी धमाका (अर्थात कहाणी पारशी क्रिकेटची)

इसवीसनाच्या साधारण आठव्या शतकात इस्लामिक धार्मिक छळाला कंटाळून पारशी (झोराष्ट्रीयन) समाज आपल्या मूळ पर्शिया (आत्ताचा ईराण) या प्रांतातून भारतात आश्रयाला आला. गुजरात मधील संजाण येथे पहिल्यांदा भारतभूमीवर पाय ठेवल्यावर हा समाज प्रामुख्याने गुजरात व मुंबई प्रांतात स्थिरावला. नुसताच स्थिरावला नाही तर दुधात साखर मिसळावी तसा येथील समाजात विरघळून गेला. […]

बुद्ध ज्या प्रेमात आहे.

चेहरा या माणसाचा ज्या अलंकारात आहे पाहिजे मोती मला तो तूच ज्या रत्नात आहे. तू सुखाच्या पावसाने चिंबण्या रडते सदा मी या विजेला आसवांच्या पापणीची वात आहे.  वाहत्या जखमेत माझी झोपडी वाहून गेली तू असा घायाळ माझे घर तुझ्या दुःखात आहे.  हे पहा गजऱ्यात माझ्या फूल तेजाळून आले ही तुला ओवाळण्याची आस प्राजक्तात आहे. वाट बघताना […]

प्लॅटिनम – एक राजस धातु

सोन्यापेक्षा महाग असणारा पण अलंकारांसाठी अनेकांना आकर्षित करणारा धातू म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा चांदीसारखा पांढरा, अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. हा सोन्यापेक्षाही अधिक दुर्मीळ आहे असे मानले जाते.
पृथ्वीच्या पोटात अगदी कमी प्रमाणात सापडणारा हा धातू आहे. त्याच्या स्वत:च्या खनिजामधे तसेच निकेल व तांबं असणाऱ्या खनिजामधे हा धातू मिळतो. याचं ८ टक्के उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होतं. उत्पादन कमी असल्यानं तो महाग असतो. […]

दत्ता आंबेकर : देआई मंदिराच्या जीर्णोद्धारातून घडलेले सामाजिक परिवर्तन

दत्ता आंबेकर यांच्यासारखी माणसे कोणत्याही गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. […]

फिर सें ओ सावन अब क्यूँ ना आयें

गेले ते दिन वैभवाचे, समाधानाचे, आनंदाचे भूतकाळाची वर्तमानाशी तुलना करत माणसें जगतात. भूतकाळाच्या एका पारड्यात आनंद असेल तर दुसऱ्या पारड्यात आनंदच हवा तरच पारडं समान होईल. तुलना म्हणजे तराजूच. आनंदाच्या आठवणीवरच माणसें जगतात. आपने कभी थे अब है परायें ही जाणीव बेचैन करतें. […]

दोन देशीचा संसार

आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करावे हे प्रत्येक होतकरू क्रिकेटपटूचे अंतिम ध्येय, स्वप्न असते. फार थोड्या नशीबवान खेळाडूंच्या या स्वप्नाची पूर्तता होते. पण तुम्हाला माहीत आहे का की असेही काही मोजके क्रिकेटपटू आहेत की जे केवळ एका नाही तर चक्क दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. कौटुंबिक स्थलांतर, शिक्षण वा नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमन, स्वदेशात संधीचा अभाव, विदेशातर्फे खेळण्याची सुसंधी, राजकीय परिस्थिती अश्या विविध कारणांनी क्रिकेटपटू दोन देशांसाठी खेळताना दिसले आहेत. […]

1 2 3 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..