नवीन लेखन...

व्यंकटेश माडगुळकर – हरहुन्नरी लेखक

नवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या  आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली […]

कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार

कृतज्ञता  हे  मानवी स्वभावाचे एक अंग आहे.किंबहुना ते असायलाच  हवे. त्यावरून तो किती सुसंस्कृत आहे हे दिसून येते. तो एक महत्वाचा संस्कार आहे. काहीजणाकडे तो उपजत असतो. काही जणांकडे तो डोळसपणे आपल्या आजूबाजूला, समाजाकडे पहिल्याने येतो. त्यासाठी माणसाने सामाजिक भान ठेवायला हवे. पण कृतज्ञता संस्काराचे मूळ स्त्रोत आहे स्वत:चे कुटुंब. कुटुंबातील मोठ्या माणसांकडे तो असणे गरजेचे आहे. […]

एस टी डेपो – तुमचा माझा सर्वांचा

महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एकसारखा असतो, किंबहुना तो वेगळा  नसतोच. मोठ पटांगण. त्याच्या एकाबाजूने एसटी येण्याचा मार्ग, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो. येण्याच्या मार्गाच्या सुरवातीला उसाच गुऱ्हाळ, त्याच नाव कनिफनाथ रसवंती गृह. मालक फडतरे बंधू, मला न उलगडलेलं एक कोडं आहे की सगळ्याच उसाच्या गुऱ्हाळाची नावं कनिफनाथ व मालक फडतरे बंधू का ? […]

कोकण – ग्रीष्माचे आणि पावसाळ्याचे

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते. चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो……. […]

प्रतिभावंत शांता शेळके

परमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या. […]

ग्रीष्माचे दोन रंग

मार्च महिन्याच्या सुरवातीस थंडीचा कडाका ओसरू लागतो. हवेत सुरेख गारवा येऊ लागतो.  स्वेटर रजया बासनात गुंडाळून ठेवल्या जातात.पंख्याचा वेग वाढला जातो. एप्रिलच्या सुरवातीस   कूलर खिडक्यावर विराजमान होतात. सकाळी दहानंतर घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसतं. प्राणी,पाखरे सावलीचा आधार शोधतात. सगळीकडे रखरख वाढू लागते. सूर्य आग ओकू लागतो.वारासुद्धा तापू लागतो.अंगाची काहिली होऊ लागते. सारीकडे वैराण भासू  लागते. उन […]

ग्रीष्माचे दोन रंग

वास्तविक वर्षभर गुमान गप असणारा गुलमोहर उन्हाळ्यात राजासारखा तेजपुंज  दिसू लागतो. गुलमोहराची  विशेष अपेक्षाही नसते. त्याची वेगळी निगा राखावी लागत नाही.तो कुठेही तग धरतो.मग तो  शेताचा बांध असो, नाहीतर शाळेचे पटांगण असो ,रस्त्याच्या बाजूला असो, किंवा एखाद्या बंगल्याचे आवर असो.उन्हाळ्याच्या रखरखीत पणात काही मोजकी झाडे ज्या दिमाखात वावरतात त्यात एक गुलमोहर. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..