नवीन लेखन...

मडेलिना लविन – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मडेलिनचा जन्म लियॉन फ्रांस येथे झाला.तिचे वडील एक fabric designer होते. मडेलिनचे लग्न 19 व्या  वर्षी मारसेल लवींज बरोबर झाले.तिला दोन मुले  झाली गाय आणि नोएल,  तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महायुद्धात तुरुंगवास झाला.पण  त्याला 1943 मध्ये जर्मनीने सोडून दिले. पुढे त्या दोघांत पटेनासे झाले. त्यामुळे त्यानी घटस्फोट घेतला. मेडेलिनने पहिली नोकरी लियोन येथे फ्रेंच उठाववाद्यासाठी स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या गुप्तहेर संघटनेसाठी  खोटी ओळखपत्रे व इतर कागदपत्रे तयार करणे  त्यांना जर्मनीच्या ताब्यातून मुक्तता करण्यासाठी मदत करणे.तिने अश्या अनेक उठाववाद्याना मुक्त केले.

एसओई संघटनेच्या मते ती असामान्य, प्रचंड बुद्धी असलेली. सूचना तंतोतंत पाळणारी होती.तिच्या घरातून एसओई एजंट बिनतारी मशीन चालवत असत. तिने एसओई साठी कुरियर म्हणून काम केले. जानेवारी 1944 मध्ये तिच्या व साथीदार बोरोशच्या लक्षात आले की फ्रेंच पोलिस त्यांच्या अटकेच्या तयारीत आहेत. हे समजताच ब्रिटन सैन्याने  विमानाने ती व तिचे अनेक साथीदारांना इंग्लंड मध्ये आणले. इकडे लियॉन सरकारने तिला तुरुंगवास फर्मावला. इंग्लंड मध्ये तिला सैनिक शिक्षण, पॅरॅशूट  व बिनतारी संदेशचे शिक्षण देण्यात आले. पण एसओई एजंटच्या कमतरतेमुळे ते अधर्वट ठेवण्यात आले. तिला पॅरॅशूट मधून 24 एप्रिल 1944 ला फ्रांस मधून उतरवण्यात आले. ती ताबडतोब सिल्व्हरस्मिथ नेटवर्क पसरवण्यासाठी रेम शहरात गेली. तिथे तिने एपेमे भागात घर भाड्याने घेतले. तिचा मित्र हेनरी बोरोश सिल्व्हरस्मिथ नेटवर्कचा प्रमुख झाला. पुढे कित्येक महीने ती एसओई गुप्तहेर संघटणे साठी काम करत राहिली. आजूबाजूला अनेक जर्मन वावरत होते. तिला सतत लपूनच काम करावे लागे.

अमेरिकन फौजांनी 29 ऑगस्ट 1944 ला लियॉन स्वतंत्र केले. तिने आपले काम सप्टेंबर 1944 मध्ये संपवले. ती गुप्तहेराचे काम करे पर्यन्त तिची दोन्ही मुले  तिच्या आई वडिलांकडे होती. त्यांच्यासह लियॉनला परतली पण पॅरिसला परंतु शकली नाही कारण तिला कोर्टाने दहशद वादी म्हणून आजन्म कारावास सुनावला होता. 25 फेब्रुवारी 1945 ला रक्ताच्या गुठळी मुळे तिचा मृत्यू झाला.

— रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..