नवीन लेखन...

हेविवा रेक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

हेविवाचा जन्म 22 जून 1914 रोजी नदाबूला या स्लोवाकिया मधील  खेड्यात झाला. तिचे बालपण बांसका बस्तरिका येथे गेले. तिने होमशोर होतजे ह्या  ज्यू संघटने मध्ये प्रवेश केला. तसेच पालमाच संस्थेमध्ये काम करू लागली 1939 मध्ये जगभर असलेल्या विस्थापित ज्यू लोकांच्या मदतीसाठी निघालेल्या संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली. 1942 मध्ये ज्युईश डीफेन्स डिपार्टमेंटने ठरवले की पेलसटाइन  मधून काही ज्यू बाहेर पाठवायचे व नाझी जर्मनच्या ताब्यातील भागातील ज्यूना मदत करायची. ब्रिटीशांना असे त्या भागाची माहिती असणारे व स्थानिक भाषा बोलू शकणारी माणसे हवीच होती.

ब्रिटिशांच्या एसओई संस्थेने अश्या माणसांची ज्याना मध्य युरोपची माहिती असेल त्याची मागणी पालमाच संस्थेसाठी केली. हि मागणी पुरुष व स्त्री दोघांसाठी होती. हाविवाने जायची तयारी दर्शवली व ती गेली. जर्मन कंबईक प्रांतात पॅरॅशूटने उतरणे अति धोक्याचे होते. मिशनच्या आधी हाविवाने मैत्रिणीला सांगीताले  की ती परत येईल की नाही यांची खात्री नाही. स्लोवाकच्या बंकरमध्ये शस्त्रधारी ज्यू होते. जर्मन व त्यांच्या इदर देशांच्या संघटनेत उठाव होणार होता. पण रेड आर्मीने माघार घेतली. 28 ऑगस्ट मध्ये जर्मनांनी स्लोवाकिया काबिज कारायचे ठरवले. हाविवाला पॅरॅशूटचे ट्रेनिंग देण्यात आले. पहिल्यावेळेस चुकून आधी उडी मारल्याने तिचा हात दुखावला. तिच्या ट्रेनरला वाटले हि उपयोगाची नाही. पण तिने ट्रेनिंग यशस्वी केले. तिला मिशनसाठी कैरोत पाठवण्यात आले. तिने उतरायचा प्लान केला पण ब्रिटिश ऑथॉरिटीने नकार दिला कारण त्यानं माहिती होते की जर्मन आपल्या हद्दीत मुलीना बॉर्डर क्रॉस करू देत नाहीत. त्यामुळे हाविवा पकडली गेली तर तिला नक्की तुरुंगात टाकतील. तिच्या डोळ्यात अश्रु आले असे असेल तर माझा काय उपयोग ? आम्ही चौघांनी  एकत्र उतरायचे ठरवले होते. तीन पुरुष उतरले व थोडे दिवस बांसकाला राहिले आणि आश्चर्य म्हणजे हाविवा तेथे आधीच पोहोचली होती आणि इतर ज्यू बरोबर काम करत होती. स्लोवाकिया मधील लिडबर्न ऑपरेशन साठी अमेरिकन व ब्रिटिश ऑफिसरना जाऊन मिळाली.

महिन्याच्या शेवटी बेरडीक रेडिओची  साधने घेऊन त्यानं मिळाला. ते सगळे रेस्क्यू ऑपरेशन साठी काम करू लागले. ज्यू संघटनांना मदत करणे त्यांच्यातील तंटे सोडवणे,त्यानं आर्थिक व इतर मदत करणे,अशी कामे करू लागले. त्यानी ज्यूना पेलेसतीनला जाण्यास मदत करू लागले त्यांना स्वस्तात जेवण देण्यासाठी ग्रुप बनवला. निर्वासितासाठी कम्युनिटी सेंटर बनवली. ज्यू मुलांना आधी हंगेरी व नंतर पेलेस्तिनला नेण्यास मदत केली. जर्मनांनी अश्या ज्यू ना मारण्यासाठी मोहीम आखली. 23 ऑक्टोबर 1944 ला यूक्रेन तृपच्या मदतीने ज्यू  ना शोधायची मोहीम घेतली. हाविवाच्या ग्रुपने बांसका सोडायचे ठरवले. हाविवा व इतर 40 ज्युनि पलायन केले व डोंगरात कॅम्प चा आश्रय घेतला. जर्मनांनी कॅम्प शोधला हेविवा व इतर साथीदाराना पकडले. 20 नोव्हेंबर 1944 ला हेविवाला क्रेमेनिका गावात ठार करण्यात आले.त्या सगळ्यांना एकत्र पुरण्यात आले. सप्टेंबर 1945 मध्ये तिचे शव बाहेर काढण्यात आले व सन्मानपूरवर प्राग येथे दफन करण्यात आले. 10 सप्टेंबर 1952 ला तिचे शव पुन्हा बाहेर काढण्यात आले व जरूसलेम  येथे दफन करण्यात आले.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..