नवीन लेखन...

वरजिनिया हॉल- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

दुसऱ्या महायुद्धात ज्या काही वीरांगना होऊन गेल्या त्यामध्ये एक महत्वाची होती ती म्हणजे वर्जिनिया हॉल.तिचा जन्म बाल्टिमोर येथे  ६ एप्रिल १९०६ रोजी झाला.कोलंबिया विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. तीचे फ्रेंच,इटालीयन,जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.फेब्रुवारी १९४०च्या सुरवातीला तिने फ्रांस सैन्यामध्ये रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम केले.फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ती स्पेनला गेली.तिथे तिची ओळख ब्रिटीश गुप्तहेर,जॉर्ज बेलोस याच्याशी झाली. तो तिच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. वर्जिनिया हॉल-(SOE) मध्ये एप्रिल १९४१मध्ये दाखल झाली. ती न्युयोर्क पोस्ट या वृत्तपत्राची वार्ताहर म्हणून काम करू लागली.त्या निमित्ताने तिला मुलाखती घेणे,माहिती गोळा करणे,कागदपत्रे हाताळणे याचा सैन्याला उपयोग झाला. दुसऱ्या महायुद्धात ती मेरी व डायना नावाने वावरली.ती ब्रिटनच्या Special operation Executive(SOE) या महत्वाच्या सघटनेत व फ्रान्समध्ये अमेरिकेच्या युद्धनीती ऑफिसमध्ये काम करत होती.काम होते नाझींनी पादाक्रांत केलेल्या युरोपला नाझीबद्द्ल हेरगिरी करणे व नाझी यंत्रणेला घातपात करून नष्ट करणे.तिने स्वताचे एक नेटवर्क तयार केले होते.केवळ १५ महिन्यात ती दोस्त राष्ट्राच्या गुप्तहेरांना,शस्त्रास्त्रे,पैसा पुरवणे,भूमिगत व्हायला मदत करणे जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवणे अश्या गोष्टी करु लागली.याचा सुगावा नाझीना लागताच ती फ्रांस मधून सटकली.

मार्च १९४४मध्ये ती पुन्हा फ्रान्सला परतली,व वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करू लागली.विशेष म्हणजे हे काम ती नाझींनी बळकावलेल्या प्रांतात अतिशय जोखीम पत्करून करू लागली.तिने हेरगिरी करताना आपला पाय गमावला असूनसुद्धा क्रूर गेस्टोपो(नाझी सैनिक) तिला दोस्त राष्ट्राची अतिशय धोकादायक गुप्तहेर मनात असत.अचानक ऑक्टोबर १९४१मध्ये तिच्या कानी आले कि फ्रेंच पोलिसांनी १२ गुप्तहेरांना पकडून बर्जेरक  येथे तुरुंगात डांबले.वायरलेस ऑपरेटर जॉर्ज बेग यांनी काही पत्र बर्जेरक तुरुंगातून पळवली व वर्जिनिया हॉलला दिली.तिने डांबलेल्या एका  कैद्याच्या बायकोला घेऊन  कैद्यांच्या सुटकेचा प्लान बनवला कैद्याची बायको खाणे देण्याच्या निमित्ताने तुरुंगात जात असे.त्यात टीनचा डबा असे.त्या टीनचा उपयोग किल्ल्या बनवण्यासाठी होत असे. १५ जुलै १९४२ मध्ये कैदी तुरुंगातून निसटले. लपतछपत ते वर्जिनिया हॉलला ल्योन येथे ११ ऑगस्टला भेटले.

फ्रांस पोलीसाच्या भोंगळ कारभारामुळे कैदी निसटले,हे पाहून नाझींचा तिळपापड झाला.त्यांनी ५०० पोलिसांना त्यांचा मागोवा घेण्यास पाठवण्यात आले. वर्जिनिया हॉल ला याचा सुगावा लागताच ती कुणालाही न सांगता ल्योनकडे निसटली.स्पेन सरकारने तिला अटक केली.पण अमेरिकन अम्बेसीने वजन वापरून तिला सोडवले.जुलै १९४३मध्ये ती लंडनला परतली.ब्रिटनने तिला पुन्हा फ्रान्सला जाऊ देण्यास नकार दिला कारण त्यात धोका होता. तिने पुन्हा वायलेस ऑपरेटरची नोकरी पत्करली.पण ती ६ जुन १९४४मध्ये पुन्हा फ्रान्सला परतली (SOE)ने त्यासाठी फ्रांसने घातपात,गनिमी कावा साठी  तिचे मार्सेले मोण्ताज नावाने खोटे ओळखपत्र बनवले.तिचे रूपच बदलले तिला म्हातारी बनवण्यात आले.दुसऱ्या महायुद्धानंतर तिने सामाजिक कार्य केले.१९४७मध्ये तिने पुन्हा अमेरिकेच्या युद्धनीती संघटनेत काम सुरु केले.तिचे काम होते, गुप्त्वार्ताची छाननी करणे.युरोपमध्ये कम्युनिस्टांचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रयात केले.१९६० साली ती निवृत्त झाली. वर्जिनिया हॉलची पॉल  गोलोटशी मैत्री झाली.त्यानंतर त्यांनी लग्न केले.तिला मिळालेले सन्मान distinguished service cross,member of the British Empire, criox de Guerre ८ जुलै १९८२मध्ये मध्ये ती मृत्यू पावली.मृत्यू नंतर  २००६मध्ये तिची १००वी जयंती साजरी झाली.अमेरिकेच्या CIA ने तिच्या नावाने ट्रेनिंग सेंटर उभारले.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..