नवीन लेखन...

मार्गरेट नाईट- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मार्गारेट नाईटचा जन्म 19 एप्रिल 1920 रोजी पॅरिस येथे झाला. तिचे सांकेतिक नाव निकोल होते.ती वुमन ट्रान्सपोर्ट सर्विस मध्ये काम करीत असे. 1944 मध्ये तिने ब्रिटिश गुप्तहेर संघटना एसओई या  संघटनेने एका हॉटेलमध्ये तिचे उत्तम फ्रेंच ऐकून तिला एसओई मध्ये दाखला घेण्यास सांगितले. तिने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला. ती तारीख होती 11 एप्रिल 1944. पॅरॅशूट मधून उडी घेण्याची भरपूर सराव करून घेतल्यावर तिला जर्मनीने काबिज केलेल्या विनसी फ्रांसमध्ये सीक्रेट ब्रिटिश कुरियर म्हणून उतरवण्यात आले.

निकोल ह्या टोपणनावाने तिने खेचरामार्फत मालवाहतूक करण्याचे काम केले. तिने जून 1944 मध्ये नॉर्मनडी येथे युद्धभूमीतून गुप्त संदेश पोचवण्यासाठी येजा केली जे अतिशय जोखमीचे काम  होते.फ्रेंच उठाववाद्या बरोबर नॉर्मनडी येथे  तिने जर्मन सैन्यावर स्टेन गनने फायरिंग करण्यात स्वता भाग घेतला. जुलै 1944 मध्ये ती व तिचे 30  फ्रेंच साथीदार यांना  जर्मनीचा वेढा फोडून गुप्तपणे पळून जायचे होते. पण त्यांचा साथीदार  रॉजर बरडेट याने दगाबाजी केली. योजनेची खबर नाझीना दिली तरी ते पळून गेले. पुढे रॉजर ला अटक झाली आणि मृत्युदंड फर्मावण्यात आला,पण तो नंतर रद्द झाला.त्याला पुढे 1955 मध्ये मुक्त करण्यात आले. साल 2004 मध्ये तिचा मृत्यू झाला.  मार्गरेटने बजावलेल्या कामगिरी बद्दल ब्रिटन फ्रांस व अमेरिके तर्फे पुरस्कार देण्यात आले. ते पुढील प्रमाणे होते.

1 ) The Most Excellent Order of the British Empire,[5] 2) the Croix de Guerre, 3 ) the Presidential Medal of Freedom.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..