नवीन लेखन...

मडेलिना सेरसूओलो दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मडेलीना चा जन्म 2 फेब्रुवारी 1920 रोजी नेपल्स इटली येथे एका मध्यमवर्गीय कामगारांच्या पोटी झाला.तिचे वडील कारलो कूक होते. ते एका कंपनीत काम करत होते ती कंपनी बंड पडली. त्यानंतर त्यानी स्वताचे पिझ्झाचे दुकान काढले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा मडेलिना एका बुटांच्या कंपनीत काम करत होती. एके दिवशी जर्मन नाझी  कंपनीत आले त्यानं फॅक्टरी लुटायची होती म्हणून त्यानी गोळीबार केला,त्यावेळी मडेलिना तिथेच थांबली आणि किती सैनिक आहेत ते मोजत होती.तिने जर्मन सैन्याविरुद्ध सरळसरळ लढा पुकारला. यासाठी तिला मेडल ऑफ मिलिटरी व्हेटोर हे मेडल मिळाले. आणि तिचा रॉयल पॅलेस मध्ये सत्कार कारण्यात आला.

इटलीचा मूसोलिनी व हिटलर यांच्यात मैत्री करार झाला होता. असे असूनही मेडेलिना स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव  या ब्रिटनच्या गुप्तहेर  संघटने साठी काम करत होती. 23 ऑक्टोबर 1943 ते 8 फेब्रुवारी 1944 पर्यन्त ती एसओई साठी  काम करत होती. तिने हिलसाइड ll व केल्विन या मिशन मध्ये भाग घेतला. हिलसाइड ll या मिशन मध्ये शत्रूराष्ट्रात घुसायचे होते. तर केल्विन हे सागरी मिशन होते. त्यासाठी तिने मोटर टोऱ्पेडओ बोट या विसाव्या शतकातील अतिशय वेगवान बोटीचा उपयोग केला. तिचा वेग स्टीम बोटीपेक्षा कितीतरी जास्त असे. ती बोट घेऊन कारसेकं येथे गेली. कारण तिला ब्रिटनने प्लान आखल्या प्रमाणे  जर्मनीची हत्यारे व स्फोटके उद्धवस्त करायची होती.पण हा प्लान यशस्वी झाला नाही. पुढे मडेलिनाला इटलीत उतरवण्यात आले.(इटली व जर्मनी एकत्र ब्रिटिशांविरुद्ध लढत होते.) तिला माहिती मिळवण्यासाठी रोममध्ये एना एंडरीया या कलाकार महिलेची नोकर बनवून घुसवण्यात आले होते

एना जर्मन अधिकाऱ्यासाठी जंगी पार्ट्या देत असे व त्याच्या कडून जर्मनच्या योजनांची गुप्त माहिती मिळवत असे. एसओईच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे मडेलिना रायफल व हँड ग्रेनेड वापरण्यात अतिशय कुशल होती. ती 8 ऑगस्ट 1944 पर्यन्त एसओई मध्ये काम करत होती तिला बक्षीस म्हणून 7500 लीरा (ईटलीचे चलन) देण्यात आले. युद्ध संपल्यावर तिला ब्रिटन तर्फे मेरिट सर्टिफिकेट देण्यात आले. 23 ऑक्टोबर 1999 मध्ये तिचा मृत्यू झाला.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..